मौदा गावाची ओळख शहीद अमृत भदाडे यांच्या नावाने व्हावी : आ. चंद्रशेखर बावनकुळे

    03-May-2022
Total Views | 81
 
 
 
 
 
amrut
 
 
 
 
मौदा : त्यासाठी मेगा सर्च ऑपरेशन राबविण्यात आले असून, राज्य सरकारच्या निर्णयांमुळे येथील नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला होता. या संपूर्ण घडामोडींचा साक्षीदार राहिलो असल्याच्या भावना राज्याचे माजी मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या.
 
 
 
 
मौदा येथे शहीद अमृत प्रभुदास भदाडे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण प्रसंगी आ. चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यावेळी आ. टेकचंदजी सावरकर, शिवराजजी गुजर, तापेश्वरजी वैद्य, राजाभाऊ तिडके, देवेन्द्रजी गोडबोले, तुळशीराम काळमेघ, भारतीताई सोमनाथे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
 
 
आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्याला नक्षल चळवळीने अक्षरशः पोखरून टाकले होते. तेथे विकास होत नव्हता. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा सरकार स्थापन झाले आणि नक्षलमुक्त गडचिरोलीचे अभियान प्रारंभ झाले. त्या पाच वर्षात राज्य सरकारकडून झालेल्या कारवायांनी नक्षल चळवळ पूर्णतः हादरून गेली होती.
 
 
 
 
१ में २०१९ रोजी गडचिरोलीच्या कुरखेडा भागात नक्षल्यांनी भ्याड हल्ला केला. या घटनेत सुमारे १५ जवानांचे जीव गेले. सुरक्षा दलाची मोठी हानी झाली असल्याचे यावेळी आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. मौदा वासियांनी शहीद अमृत भदाडे यांचे स्मारक उभारून त्यांच्या योगदानाच्या स्मृती अमर केल्या आहेत. शहीद अमृत भदाडे यांचे साहसी जीवन नव्या पिढीला माहीत व्हावे यासाठी हे स्मारक महत्वाचे ठरणार आहे. आगामी काळात शहीद अमृत भदाडे यांच्याच नावाने मौदा ओळखले जावे, अशी अपेक्षा यावेळी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
 
 
 
 
कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर, तहसिलदार मलिक विराणी, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे, भाजपा नागपूर जिल्हा उपाध्यक्ष नरेशजी मोटघरे, माजी सरपंच मोरेश्वरजी सोरते, जि. प. सदस्य अरुण हटवार, ज्ञानेश्वरजी वानखेडे, मुन्ना चलसानी, राजू सोमनाथे, हंसराज भदाडे, गुड्डू जयस्वाल, दुर्गाताई राजू ठवकर, शालिनीताई कुहीकर, राजेश निनावे, राजेन्द्र लांडे, किशोर सांडे, प्रदिप मधुकर भदाडे, शुभमजी तिघरे, राजू ठवकर, सतीश भोयर, नितेश वांगे, देवाजी कुंभलकर उपस्थित होते.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121