जालना : भोकरदन तालुक्यातील चांदई गावमध्ये गावातील प्रवेशद्वाराला कोणाचे नाव द्यायचे यावरून दोन गटांत उसळलेल्या हिंसाचारात पोलीस जखमी झाल्याची घटना घडली आहे. सध्या गावात संचारबंदी लागू झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे. गावात पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे. यावेळी झालेल्या हिंसाचारात ५ पोलीस जखमी झाले आहेत.
गावातील प्रवेशद्वारावरील कमानीवर असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून दोन गटांत वाद पेटला होता. यावेळी झालेली दगडफेक इतकी भीषण होती की त्यात पोलिसांची व्हॅन, अग्निशमन दलाच्या गाड्यांचेही खूप नुकसान झाले. या हिंसाचाराबद्दल २५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून गावचे सरपंच आणि उपसरपंच यांना पोलिसांनी अटक केली आहे.