SIP म्हणजे काय?

    09-Feb-2022
Total Views | 232


                       

sip

 

               

 
 
एसआयपी म्हणजे म्युच्युअल फंडाची योजना, मात्र एसआयपी शेयर बाजारातील अस्थिरतेची जोखीम कमी करून शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. 
 
 

म्युच्युअल फंड सही हैह्या जाहिरातीमुळे गेल्या - वर्षात म्युच्युअल फंड ची एसआयपी चांगली प्रचलित झाली. खाली जाणाऱ्या व्याजदरामुळे, म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा पसंतीचा पर्याय ठरतो आहे. तरी अजूनही बऱ्याच गुंतवणूकदारांचा चुकीचा समझ असा आहे कि एसआयपी म्हणजे म्युच्युअल फंडाची योजना, मात्र एसआयपीहि शेयर बाजारातील अस्थिरतेचे जोखीम कमी करून शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. ह्या सुविधे द्वारे आपण म्युच्युअल फंडाच्या निरनिराळ्या प्रकारच्या योजने मध्ये आपल्या आर्थिक नियोजनानुसार एसआयपीचालू करू शकतो. आपली एसआयपीही उद्दिष्टाला धरून असावी. उदाहरणार्थ आपल्या मुलांचे उच्च शिक्षण, लग्न कार्ये किंवा आपले निवृत्तिनियोजन वगैरे. असे केल्याने आपले आर्थिक नियोजन कार्यक्षम करण्यास मदत होते. एसआयपीच्या लोकप्रियतेबद्दल बोलायचे झाल्यास, उपलब्ध आकडेवारीनुसार डिसेंबर २०२१ पर्यंत साधारण करोड पेक्षा जास्त सामान्य गुंतवणूकदार हे दरमहा रु. ११,५०० करोड एसआयपीमार्फत म्युच्युअल फंड च्या विविध योजनांमध्ये गुंतवीत आहेत. प्रत्येक महिन्यागणिक त्यात नवीन गुंतवणूकदारांची भर पडत आहे. नवीन गुंतवणूकदारांच्या माहितीसाठी आज आपण एसआयपीबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

नियमित कालावधीनंतर (सामान्यतः दर महिन्याला, काही म्युच्युअल फंड साप्ताहिक किंवा दैनिक एसआयपीची ही सुविधा देतात.) ठरावीक रक्कम म्युच्युअल फंडांत गुंतवण्यासाठी राबवण्यात येणारी प्रक्रिया म्हणजे एसआयपी होय. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीवर युनिट्स मिळतात. ज्या दिवशी आपण गुंतवणूक करतो , त्या दिवसाच्या त्या योजनेच्या बाजार मुल्या प्रमाणे ( NAV ). एसआयपीमध्ये दर महिन्याला आपण त्या योजनेचे युनिट्स जमा करीत असतो. एस आई पीमुळे सामान्य गुंतवणूकदारांना भांडवल बाजारात उतरण्याची संधी मिळते,

बाजारात सूचिबद्ध असलेल्या नामांकित कंपन्यांचे शेयर्स म्युच्युअल फंड च्या इक्विटी योजनेच्या गुंतवणुकीतून घेण्याची संधी मिळते. तसेच त्यांच्या गुंतवणुकीला शिस्त लावण्याचीही संधी मिळते

 

एस आय पी केव्हा सुरू करू शकतो?

खुल्या म्युच्युअल फंडासाठी (Open Ended Fund ) केव्हाही एसआयपी सुरू करता येते. एसआयपीसाठी आर्थिक नियोजनकाराकडे जाऊन किंवा संपर्क साधून प्रकारे एसआयपीकरता येते ) Offline पद्धतीने म्हणजेच, केवायसी कागदपत्र एक एसआयपीला चेक प्रमाणे एका किंवा अनेक अर्जावर सही करुन द्यावी लागते. एस आई पीचा अर्ज भरल्यापासून एसआयपीसुरू होईपर्यंत ३० दिवसांचा कालावधी जातो. या काळात बँक तुमची एसआयपीरजिस्टर करते दरमहा सुरू करते. ) Online पद्धतीने म्हणजेच आर्थिक नियोजकारच्या संकेत स्थळावर वर फॉर्म भरून, नेट बँकिंग मध्ये ECS किंवा ऑटो डेबिट रजिस्टर करून , अतिशय कमीवेळात एसआयपीकरता येते. Online सुविधेमुळे जगाच्या पाठीवर कुठूनही एसआयपीकरता येते. आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार तसेच आपल्या आर्थिक उद्दिष्टाला अनुसरून आर्थिक नियोजनकार एक किंवा अधिक योग्य योजनांचे संयोजन करून देतात.

 

किती काळासाठी एसआयपी ठेवता येते?

अनेक म्युच्युअल फंडांतून किमान १२ महिने एसआयपीसुरू ठेवावी लागते. गुंतवणूकदारांना एस आई पीसाठी कालावधी निवडण्याची मुभा असते. याखेरीज गुंतवणूकदाराला, त्याने म्युच्युअल फंडाला पुढील सूचना देईपर्यंत एसआयपीसुरू ठेवण्याचाही पर्याय असतो.त्याला " पर्पेच्युअल एसआयपी" असेही संबोधतात. प्रत्येक एसआयपीगुंतवणुकीच्या उद्दिष्टाला जोडून घ्यावी, असा सल्ला नियोजक गुंतवणूकदारांना नेहमी देतात, जेणेकरून ते उद्दिष्ट साध्य होईपर्यंत ती एसआयपीसुरू ठेवता येईल.

 

एस आई पीची रक्कम बदलता येते का?

गुंतवणूकदाराला त्याच्या एस आई पीची रक्कम कमी करता येते किंवा वाढवता येते. मात्र यासाठी पहिली एसआयपीरद्द करून नवी एसआयपीसुरू करावी लागते. यासाठी म्युच्युअल फंडाकडून कोणताही दंड आकारला जात नाही. आपल्या वाढत्या उत्पन्नाप्रमाणे आपण एसआयपीची रक्कम वाढवू शकतो किंवा काही नवीन खर्च असतील तर एसआयपीची रक्कम कमीही करू शकतो.

 

एसआयपी सुरू असलेल्या फंडात आपण एकगठ्ठा रक्कम गुंतवू शकतो का?

होय. एसआयपी सुरू असलेल्या योजनेत तुम्ही एकगठ्ठा रक्कम गुंतवू शकता. त्यामुळे एस आई पीत कोणत्याही प्रकारे बाधा येत नाही. ती विनाअडथळा सुरू राहते. आपल्याकडे कधी अतिरिक्त रक्कम असेल तर आपण ती गुंतवून एसआयपीतुन जमा होणारे युनिट्स वाढवू शकतो,

 

एसआयपी करताना कमीत कमी किती वर्षासाठी करावी?

आपली भांङवल वृद्धी चांगली व्हावी यासाठी कमीत कमी १० ते १५ वर्ष एसआयपीकरणे आवश्यक आहे. त्यापूढे जेवढी वर्ष तुम्ही वाढवू शकाल तेवढा चक्रवाढीचा फायदा जास्त मिळतो. आपल्या एस आई पीला एखादं आर्थिक उद्दिष्ट लिंक केल्यास उदा. मुलांचे/मूलींचे शिक्षण, लग्न, घर खरेदी, निवृत्ती . किती वर्ष एसआयपी करायची हे आर्थिक नियोजनकार सांगतात. दीर्घावधीसाठी संयमाने आपली एसआयपीचालू ठेवावी.

 

एसआयपी करताना आर्थिक नियोजनकार कङुनच का करावी?

कुठलीही गुंतवणूक, मग तो विमा असो किंवा म्युच्युअल फंङ असो, बॅंकेतुन करने टाळले पाहिजे कारण बॅंकेतुन विक्री नंतरच्या सेवा मिळत नाहीत. एसआयपीकिंवा एकरकमी गुंतवणुक ही आर्थिक नियोजनकाराकडून केली पाहिजे त्यावर त्याचे वैयक्तिक लक्ष राहते पण सल्लागाराची निवङ मात्र थोडी काळजीपुर्वक करणे आवश्यक असुन त्याला किमान दहा वर्षाचा अनुभव असला पाहिजे कारण एवढ्या वर्षात शेअरबाजाराच्या सर्व चढउताराचे अनुभव त्याला आलेले असल्यामुळे तो काळजीपुर्वक काम करत असतो. आजकाल काही मोबाइल अँप गुंवणूकदारांना एसआयपी चालू करण्याची सेवा पुरवितात मात्र त्यात निवडलेल्या योजना मागील परतावा पाहून सूचित केलेल्या असतात. पुढेही त्या योजनेची कामगिरी तशीच चांगली राहील याची शाश्वती नसते. आर्थिक नियोजनकार नियमित पणे म्युच्युअल फंडाच्या निधी व्यवस्थापकांशी संवाद साधून गुंतवणूकदारांसाठी शेयर बाजाराबाबत अधिकाधिक माहिती गोळा करून योग्य सल्ला देतात.

 

एसआयपी सुरु केल्यावर त्याला सतत निरीक्षण करणे गरजेच आहे का?

नाही, कारण एसआयपी सुविधेद्वारे आपण बाजारातील गुंतवणुकीची जोखीम कमी केलेली असते. एसआयपीमधून आपल्या गुंतवणुकीवर चक्रवाढ वाढीचा फायदा दिसायला कमीत कमी -१० वर्षे जातात. एसआयपी सुरु करणे म्हणजे एक बीज रोवण्यासारख आहे. रोज रोज बघुन त्याची वाढ कमी किंवा जास्त होणार नसते. एस आई पीचे झाड नैसर्गिकपणे वाढण्यास तेवढा कालावधी देणे क्रमप्राप्त असते.

 

एसआयपीकरताना किती परतावा गृहीत धरावा?

नेमका किती परतावा मिळेल हे सांगण थोडे अवघड असले तरी नियोजन करताना नियोजनकार १०-१२% परतावा गृहीत धरुन चालतात. त्यानुसार तुमची एसआयपीपुढील १०/१५/२० वर्षात किती रक्कम प्राप्त करु शकेल याचा किमान अंदाज बांधता येतो. बहुतेक आर्थिक नियोजनकरांच्या संकेत स्थळावर त्याचे कॅल्क्युलेटर असतात.

 

एसआयपीचा एखाधा हप्ता चुकला तर?

एखादा हप्ता चुकला तर, म्युच्युअल फंड आपल्याला काही भार लावत नाहीत. त्या महिन्यामध्ये हप्त्याच्या रकमेचे युनिट जमा होणार नाहीत. आपल्या बँकेकडून ECS डेबिट झाल्याबद्दल काही भार लागू शकतो. लागोपाठ महिने जर आपले हप्ते चुकले तर म्युच्युअल फंड एसआयपी बंद करतात. एसआयपीपुन्हा चालू करायची झाल्यास नवीन करावी लागते. जर गुंतवणूक तोडायची झाल्यास आता पर्यंत एसआयपीतुन जमा झालेल्या गुंतवणुकीवर आपल्याला बाजार मूल्य मिळते.

 

जर काही कारणास्तव मला काही महिने एसआयपीचा हप्ता भरणे शक्य नसेल तर?

काही कारणास्तव जर काही महिने एसआयपीचे हप्ते भरणे शक्य नसेल तर म्युच्युअल फंड आपल्याला PAUSE एसआयपीची सुविधा देतात. आपण काही महिने एसआयपीथांबवून नंतर पुन्हा चालू करू शकतो. ही चांगली सुविधा आहे. त्यामुळे आपण आपले उद्दिष्ट पूर्ण होई पर्यंत एसआयपी चालू ठेवू शकतो.

 

एसआयपी सुरु केल्यावर शेअरबाजार खाली येवुन बाजारमुल्य कमी झाल्यास काय कराव?

शेअरबाजार खाली आल्यास एसआयपी व्यतिरिक्त काही एकरकमी गुंतवणुक करावी यामूळे बाजाराच्या खालच्या पातळीवर जास्त युनिट जमा करण्याची संधी मिळते एस आई पीचे आर्थिक उद्दिष्ट वेळेआधीच पुर्ण व्हायला मदत होते. अशी वेळ आल्यास आपल्या आर्थिक नियोजनकारास संपर्क साधुन अशा सुचना देता येतात. एक रकमी गुंतवणूक करणे शक्य नसेल तर -१२ महिन्यासाठी आपली एसआयपीरक्कम वाढवावी आणि जास्त युनिट जमा करण्यासाठी नियोजन करावे.

 

स्टेप अप एसआईपी म्हणजे काय ?

आपले उत्पन्न हे दर वर्षी वाढत असते, अशावेळी आपण आपली एसआयपीची रक्कमही वाढवली पाहिजे. एसआयपी सुरु करतानाच आपण तशी सूचना म्युच्युअल फंडास देऊ शकतो. समझा आपण रु ५००० ची एसआयपी चालू केली आहे आपण स्टेप एसआयपीदर वर्षी रु ५०० ने वाढवण्याची सूचना सुरवातीस दिल्यास दर वर्षी आपली एसआयपीची रक्कम वाढत जाईल, म्हणजेच दुसऱ्या वर्षी रु ५५००, तिसऱ्या वर्षी रु ६००० अशी एसआयपीदर वर्षी वाढत जाईल.

 

छोट्या रकमेच्या अनेक एसआयपी कराव्यात कि एक किंवा कराव्यात?

काही दिवसांपासून बँकांनी ECS डेबिट साठी शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. हे शुल्क प्रत्येक डेबिट साठी असते. जर एखाद्या गुंतवणूकदारास १००० च्या १० एसआयपी करायच्या असतील तर प्रत्येक एसआयपी डेबिट साठी शुल्क भरावे लागेल मात्र ५००० च्या दोन एसआयपी केल्या तर शुल्क दोन डेबिट साठी लागेल. एस आय पी तुन चांगला परतावा मिळण्यासाठी आता छोट्या छोट्या अनेक एसआयपी न करता मोजक्या एस आय पी कराव्यात.

 

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेच्या अधीन असते, योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

निलेश तावडे

९३२४५४३८३२

www.nileshtawde.com

लेखक हे २० वर्ष म्युच्युअल फंड क्षेत्रात कार्यरत होते, सध्या ते आर्थिक नियोजकार आहेत


 
 
अग्रलेख
जरुर वाचा
कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत...

महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या, जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले ..

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

Bangladesh देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच आता छोट्या शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला...

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

Extramarital Affairsठेवणारी काळीज हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर जयपूरमध्ये पती -पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या परपुरूषाला तिच्या पतीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता धन्नलाल सैनी याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला जाळलं आहे...