सारस संवर्धनासाठी राज्य सरकार करणार उपाययोजना

सेंद्रिय धान उत्पादनासाठी नावीन्यपूर्ण योजना करण्याचा विचार

    22-Dec-2022
Total Views | 52

sudhir mungtiwar



नागपूर : गोंदिया जिल्ह्यात दिवसेंदिवस कमी होत असलेली सारस पक्षांची संख्या हा गंभीर विषय असून, सारस संवर्धन आणि संरक्षणासाठी तातडीने प्रयत्न करा तसेच ही संख्या कमी होण्यामागील कारणे काय आहेत, याचा अभ्यास करण्याचे निर्देश राज्याचे वनमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत .


सारस पक्षी संवर्धनासंदर्भात हरिसिंग वन सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सारस पक्षी संवर्धनासंदर्भात मानवी संवेदनशीलपणे विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. परिसरात होणाऱ्या अतिउच्च दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे तसेच शेतीमध्ये होणारा रासायनिक खतांचा, कीटक नाशकाचा वापर, घरट्यांना होणारे नुकसान या सर्वच बाबींवर बैठकीत चर्चेला आल्या.


यावेळी ना. मुनगंटीवार यांनी संबंधित सर्व विभागांशी समन्वय ठेऊन महावितरण, कृषी विभागाशी संबंधित अडचणींचा सूक्ष्म विचार करुन उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या. शेतात सेंद्रिय खतांचा वापर व्हावा यासाठी जागृती करता येईल का, सारस पक्षी मित्र तयार करुन त्यांना मानधन देता येईल का, यासाठी निधीचे योग्य नियोजन व्हावे, शासनाच्या आकस्मिक निधीतून अर्थसहाय प्राप्त करुन देता येईल का, अश्या महत्वाच्या विषयावर ना. सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.


सारस संवर्धनासाठी सर्व गावे सेंद्रिय करण्यासाठी मनुष्यबळाचा योग्यवापर करुन उपाय योजना करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन आर्टिफिशियल बिडिंग सेंटरची स्थापना करण्याची सूचना त्यांनी केली. शुध्द धान पक्ष्यांना मिळावे, यासाठी सेंद्रिय धान उत्पादनाला प्राधान्य देण्याची गरज आहे. यासाठी नाविन्यपूर्ण योजना तयार करुन जिल्हा नियोजन विकास निधीतून सहाय्य करण्याचा मानस ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
जगातील आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन दोन वर्षात सारस पक्षांची संख्या वाढावी, यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. बैठकीला वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, मुख्य वन संरक्षक रंगनाथ नाईकडे, जिल्हा परिषदेचे सीईओ अनिल पाटील आदी उपस्थित होते.

अग्रलेख
जरुर वाचा
सामर्थ्य-परमार्थाचा मेळ म्हणजे मधु मंगेश कर्णिक!

सामर्थ्य-परमार्थाचा मेळ म्हणजे मधु मंगेश कर्णिक!

"कोकणी माणसाचे भावविश्‍व मराठी साहित्यामध्ये योग्य शब्दात चितरणारे मधु मंगेश कर्णिक म्हणजे सामर्थ्य आणि परमार्थाचा अनोखा संगम आहे" असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याच्या भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, अध्यक्ष ..

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121