मुंबई : वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याच्या दिवशी राज ठाकरे यांच्यामुळे मला शिवाजी महाराजांची भूमिका मिळाली हे अभिनेता अक्षय कुमार याने स्पष्ट केले होते. त्यानंतर लोकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आज पुन्हा अक्षय कुमार राज ठाकरे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटले. या भेटीचे फोटो मनसेच्या अधिकृत प्रोफाईलवरून शेयर झालेले आहेत.
फोटो व्हायरल झाल्यानंतर भेटीचं कारणही समोर आलं आहे. शिवाजी महाराजांची भूमिका राज ठाकरे यांच्यामार्फत मिळाल्यानंतर त्यासाठी प्रशिक्षणही त्यांच्याकडूनच घ्यावं या उद्देशाने अक्षय कुमार राज ठाकरेंना त्यांच्या निवासस्थानावर भेटला असे समजते.
‘छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळावी हे माझं स्वप्न होतं. पण, ही भूमिका मला मिळण्यामागे एका व्यक्तीचं श्रेय आहे, ते म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरे यांनी मला सांगितलं की, अक्षय तू ही भूमिका करायला हवी, तू करू शकतोस. त्यांच्या आग्रहामुळेच ही भूमिका माझ्या वाट्याला आली’, असे अक्षय कुमार म्हणाला होता. यानंतर आता त्याने राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.