मुंबई : गोव्यात झालेल्या ५३व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (इफ्फी) ज्युरी बोर्डाचे प्रमुख नदाव लॅपिड यांनी काश्मीर फाइल्स या सिनेमाविरोधात वादग्रस्त टिपणी केली आहे. काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचे वास्तव मांडणारा, काश्मीर फाइल्स हा अपप्रचार आणि अश्लील चित्रपट असल्याचे लॅपिड अत्यंत धक्कादायक वक्तव्य केले.त्यांच्या या वक्तव्यावर सर्वत्र टीका होत आहे. नदाव लॅपिड यांना वादाची पार्श्वभूमी असल्याचे समोर आले. त्यांनी स्वतःची मातृभूमी असलेल्या देशाला आजारी आत्मा असे म्हंटले होते.
वास्तविक, नदाव लॅपिड हे डाव्या विचारसरणीचे इस्रायली चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी आतापर्यंत एकूण १३ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. नदाव लॅपिडकडे इस्रायलचा द्वेष करणारी व्यक्ती म्हणून पाहिले जाते. ज्यूंच्या एकमेव राष्ट्र आणि मातृभूमीबद्दल नदाव लॅपिडचे विचार किती चांगले आहेत, याचा अंदाज त्यांच्या विचारांमध्ये इस्रायलच्या पॅलेस्टाईनविरोधी पक्षाची दिसून येतो.
एका मुलाखतीत लॅपिडने त्यांच्या 'सिनोनिम्स' चित्रपटाबद्दल बोलताना इस्रायलबद्दल म्हंटले की, “चित्रपट इस्रायलच्या आत्म्याबद्दल बोलतो. इस्रायलचा आत्मा एक आजारी आत्मा आहे. इस्रायलच्या निर्मितीच्या मुळाशी चुक दडली आहे. केवळ बेंजामिन नेतन्याहू (इस्रायलचे माजी पंतप्रधान) नव्हे तर इस्रायली लोकांमध्ये काही गोष्टी चुकीच्या आहेत. त्यांना फक्त इस्रायली असल्याचा अभिमान वाटतो."
दुसऱ्या एका मुलाखतीत नदाव लापिडने देश इस्रायल आणि तेथील लोकांशी असलेल्या आपल्या संबंधांबद्दल सांगताना ते म्हणाले कि, “मला वाटले की इस्रायल माझ्यासाठी असह्य झाले आहेत. माझ्या सिनोनिम्स या चित्रपटाच्या माध्यमातून इस्रायलवर टीका केली आहे."
पुढे ते म्हणाले, “माझा नेहमीच विश्वास आहे की इस्रायलची कथा काही विशिष्ट राजकीय मुद्द्यावर नाही. उलट, ही सर्व इस्रायली लोकांची कहाणी आहे. प्रचार व्यवस्थेमुळे, इस्रायली पूर्णपणे आंधळे असू शकतात. मला असे वाटते की त्यांचे डोळे उघडण्यासाठी, त्यांचे शरीर हलवून त्यांच्या डोक्यावर मारणे पुरेसे नाही. यासाठी अजून बरेच काही करावे लागेल. इस्रायलचे लोक मोठ्या शक्तींविरुद्ध लढत आहेत.”
लेफ्टिस्ट नदाव लॅपिड हे २५० इस्रायली चित्रपट निर्मात्यांच्या गटात आहेत ज्यांनी शोमरोन (सामारिया/वेस्ट बँक) फिल्म फंड लाँच केल्याच्या निषेधार्थ 'खुल्या पत्रावर' स्वाक्षरी केली. इस्रायली चित्रपट निर्मात्यांना आर्थिक सहाय्य आणि बक्षिसे देऊन हा व्यवसाय पांढरा करणे हेच हा फंड तयार करण्यामागचे एकमेव ध्येय आहे असे चित्रपट निर्मात्यांना वाटत होते.
Samaritan Film Fund चे अधिकृत ध्येय वेस्ट बँक (Judea and Samaria) मध्ये राहणाऱ्या ज्यूंना अनुदान देणे हे होते. तसेच वेस्ट बॅंकमधील इस्रायली नागरिकांनी बनवलेल्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी सबसिडी देणे. अशा स्थितीत पॅलेस्टिनी लोकांच्या शोषणासाठी हा फंड तयार करण्यात आल्याचे नदाव लॅपिड आणि त्यांच्या साथीदारांचे मत होते. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये वेस्ट बॅंक संदर्भात बराच काळ वाद सुरू आहे.