अल्लाशिवाय कोणी नाही, तो मसिहा आहे : झाकीर नाईक, फिफा विश्वचषकात चार जणांचे धर्मांतर!

    21-Nov-2022
Total Views | 358
  fifa world cup 2022 zakir naik
 
 
नवी दिल्ली  ( fifa world cup 2022 zakir naik ): मनी लाँड्रिंग, दहशतवादाला प्रोत्साहन, भारतात बेकायदेशीर धर्मांतर यासह अनेक प्रकरणांमध्ये फरार असलेला झाकीर नाईक फिफा विश्वचषकादरम्यान कतारला पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात कतारमध्ये एका कार्यक्रमादरम्यान झाकीर नाईकने इतर धर्मातील चार लोकांचे इस्लाम धर्मत धर्मांतर घडवून आणल्याचे वृत्त आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक इतर चार जणांसह मंचावर उपस्थित आहे.
 
 
व्हिडीओत झाकीर म्हणतो कि( fifa world cup 2022 zakir naik ),अल्लाहशिवाय कोणीही देव नाही आणि पैगंबर मुहम्मद त्याचा मसिहा आहे. झाकीर नाईक, ज्याला भारतात फरारी घोषित करण्यात आले होते, त्याला २०२२ फिफा विश्वचषकापूर्वी कतारमध्ये इस्लामचा प्रचार करणारे भाषण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. कतारमध्ये फिफा विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी विविध देशांतून येणाऱ्या चाहत्यांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत त्या निर्बंधांबाबत सतत वाद होत आहेत. विश्वचषक सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये परवानगी असलेल्या मद्यविक्रीवरही बंदी घातली जाऊ शकते. बिअर कंपनी बडवाईजरसोबतचा यांच्यातील कोट्यवधी-डॉलरचा करार संकटात सापडला आहे.
 
 
वास्तविक, फिफा विश्वचषकासाठी कतार सरकारने दारूसाठी काही नियम ठरवले आहेत. यामध्ये चाहत्यांना सामना सुरू होण्याच्या तीन तास आधी आणि तो संपल्यानंतर एक तासच बिअर खरेदी करता येणार आहे. कतारमध्ये स्त्री आणि पुरुष दोघांच्याही कपड्यांबाबत काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. येथे महिलांना शरीर उघड करणारे कपडे घालता येत नाहीत. अशा स्थितीत त्यांना तुरुंगात पाठवण्याचा नियम आहे. याशिवाय आता सामन्यादरम्यान इस्लामचा प्रचार करण्यावरून ( fifa world cup 2022 zakir naik ) वाद निर्माण झाला आहे.
 
 
झाकीर नाईक ( fifa world cup 2022 zakir naik ) आपल्या धार्मिक भाषणातून केवळ समाजात द्वेष पसरवत नाही, तर तरुणांना जिहाद आणि दहशतवादासाठी प्रेरित करतो. अलीकडेच अटक करण्यात आलेल्या अनेक दहशतवाद्यांनी झाकीर नाईकचा व्हिडिओ पाहून दहशतवादाकडे वाटचाल केल्याचे सांगितले होते. झाकीर नाईकवर भारतात मनी लाँड्रिंग, दहशतवादाला चालना देणे, धर्मांतरण, समाजात द्वेष पसरवणे, द्वेषयुक्त भाषण अशा अनेक कृत्यांमध्ये गुंतलेले आहे.
 
तो फरारी असून भारतात हवा आहे. त्याला देशात आणण्यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. २०१६ च्या अखेरीस भारताने नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवर बंदी घातली. सरकारच्या कारवाईचा सुगावा लागताच झाकीर नाईक मलेशियाला पळून गेला. त्यानंतर २०१७ मध्ये झाकीर नाईकला फरार घोषित करण्यात आले होते.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
जरुर वाचा
जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

(Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे...