श्रद्धा वालकर हत्या; पोलिसांना कवटीचा भाग आणि तीन हाडे..

    21-Nov-2022
Total Views |
Shraddha Walker Murder Case
 
 
 
नवी दिल्ली  ( Shraddha Walker Murder Case ): श्रद्धा वालकर या हिंदू मुलीची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्यने देशात भीतीचे वातावरण पसरले आहे आफताब अमीन पूनावाला या नराधमाने अत्यंत शातीर पद्धतींने श्रद्धाची हत्याकरून तिच्या शरीराचे ३५ तुकडे जंगलात फेकले. यामागे सर्व पुरावे नष्ट करण्याचा आफताबचा उद्देश होता.मात्र पोलीसांनी या प्रकरणाच्या मुळपर्यंत जाऊन तपास केला व गजाआड केले. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांना या हत्येप्रकरणी कवटीच्या खालचा भाग आणि 3 हाडे शोधण्यात यश आले आहे.
 
 
 
मिळालेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांनी आफताबला पुन्हा एकदा त्याच्या फ्लॅटवर नेले. आफताबने येथे क्राईम सीन रिक्रिएट केल्याचे बोलले जात आहे. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी २ पॉलिथिनमध्ये काहीतरी घेऊन फ्लॅट सोडल्याची माहिती मिळते. दिल्ली पोलिस आफताबच्या नाल्यातून श्रद्धाची अस्थी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांचे पथक उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातही पाठवण्यात आले आहे, जिथे आफताबने हत्येपूर्वी श्रद्धाला सहलीवर नेले होते.