नवी दिल्ली ( Shraddha Walker Murder Case ): श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आफताब अमीन पूनावाला याला अंमली पदार्थांचे व्यसन होते. तेसेच तो श्रद्धा वालकर सोबत लिव्ह-इनमध्ये राहत असला तरी त्याचे इतर अनेक मुलींशी संबंद होते. तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आफताब अंमली पदार्थांची तस्करी करायचा असा संशय पोलिसांना आहे. बहुधा त्याला श्रद्धाला ड्रग्ज पेडलर बनवायचे होते, अशीही शंका व्यक्त करण्यात येते. त्यासबंधीची माहिती तपासा दरम्यान पोलिसांच्या हाती लागली आहे.
एका रिपोर्ट नुसार ( Shraddha Walker Murder Case ) श्रद्धाला घेऊन आफताब हिमाचल प्रदेशातील तोशगाव येथेही गेला होता. तोशगाव हे अंमलीपदार्थांच्या वितरणासाठी कुप्रसिद्ध असल्याचे बोलले जाते. पोलिसांना आफताबच्या चॅटमधून त्याच्यासोबत कॉल सेंटरमध्ये काम करणारे काही लोक ड्रग्ज घेत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आफताबला श्राद्धाच्या माध्यमातून ड्रग्जचा धांदा चालवायचा होता का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुसर्या वृत्तानुसार, हत्येनंतर ( Shraddha Walker Murder Case )आफताब दिल्लीहून मुंबईला गेला होता आणि तिथून कुरिअर कंपनीद्वारे त्याचे सामान दिल्लीला पाठवले. दिल्ली पोलिसांच्या तपास पथकाने रविवारी (२० नोव्हेंबर २०२२) मुंबईत या संदर्भात कुरिअर कंपनीचे मालक गोविंद यादव यांची चौकशी केली. याच कुरिअर कंपनीने श्रद्धा आणि आफताबच्या काही घरगुती वस्तू मुंबईहून दिल्लीला नेल्या होत्या. चौकशीत कंपनीच्या मालकाने सांगितले की, आफताबने या वर्षी जूनमध्ये दिल्लीतील पत्त्यावर त्याच्या कंपनीमार्फत माल पोहोचवला होता. या सामानात घरगुती साहित्य, फ्रीज, भांडी, कपडे यांचा समावेश होता. यासाठी आफताबने २० हजार रुपयेही दिले होते.
दुसरीकडे, दिल्ली पोलीस या प्रकरणी सातत्याने काम करत आहेत. या क्रमाने, दिल्ली पोलिसांचे पथक मुंबईतील पंचतारांकित हॉटेलच्या कर्मचार्यांची चौकशी करेल जिथे आफताब प्रशिक्षणार्थी शेफ म्हणून काम करत होता. दिल्ली पोलिसांचे दोन अधिकारी आफताबबाबत हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी करणार आहेत. आफताब आपल्या कुटुंबासह मुंबईत राहत असलेल्या सोसायटीचा सचिव अब्दुल्ला खान याचीही पोलिसांनी चौकशी केली होती.