मुंबई: राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ५ नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या अनुषंगाने मोठी घोषणा या पत्रकार परिषदेत केली जाण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन १७ नोव्हेंबरला आहे याच पार्श्वभूमीवर मोठी उद्धव ठाकरे करतील,अशी शक्यता आहे.
महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिंदे सरकारविरोधात ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली होती. यासंबंधी भाष्य करण्याची शक्यता आहे. शिवाय, उद्धव ठाकरेही शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यात येणाऱ्या उद्योगांवर काय भूमिका मांडतील हे पाहणे ही महत्वाचे ठरणार आहे. उद्धव ठाकरे 3 डिसेंबर रोजी पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार आहेत. मंत्री संजय राठोड यांच्या मतदार संघातील अनेकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्या नंतर उद्धव ठाकरेंनी पोहरादेवीला जाणार असल्याची घोषणा केली होती. संजय राठोड यांच्या मतदारसंघातील दिग्गज नेते संजय देशमुख यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला आहे.