हिंगोली : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही हिंगोलीत पोहोचली होती. येथील माळहिवरात कॉर्नर सभेत भाषण करताना राहुल गांधी म्हणाले की,"अग्निवीर योजनेमुळे समाजात गुन्हेगारी वाढेल." केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी अग्निवीर आणि अग्निपथ या दोन योजना आणल्या. या दोन्ही योजनेविरुद्ध अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलन झाली. परंतु हिंगोलीच्या सभेत राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
केंद्र सरकारने सैन्यात भरती इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अग्निवीर योजना आणली. चार वर्षाच्या सेवेनंतर हे अग्निवीर हे आपल्या गावी येतील. अशावेळी या बेरोजगार झालेल्या अग्निवीर तरुणांकडे शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण असेल, मग त्यांच्याकडून गुन्हेगारी घडू शकते. त्यामुळे समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू शकते, असे वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधी केले. देशाच्या सैन्यात जाणारा तरुण हा देशाच्या सेवेसाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान द्याला तयार असतो. अशावेळी राहुल गांधी यांनी केलेले हे विधान म्हणजे भारतीय सैन्यावर आणि भारतीय सैन्याच्या प्रशिक्षणावर शंका घेतल्यासारखे आहे, अशी टीका आता राहुल गांधींवर केली जात आहे.