लंडन : ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे हिंदू संस्कृतीचे पालन करणारे आहेत. त्यांनी आपल्या पदाची सूत्रे हातात घेतली. आपल्या कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी दारात रांगोळी रेखून दिवे प्रज्वलित केल्याचा व्हिडीओ वायरल होत आहे.
" ब्रिटनच्या एकंदर पुनर्बांधणीसाठी मी शक्य तेवढी मेहनत घेईन, ज्यामुळे येणारी पुढची पिढी व त्यानंतरची पिढी दिवे लावून येणाऱ्या भविष्याकडे आशेने पाहू शकतील." असे ट्विट ऋषी सुनक यांनी आपल्या ट्विटर हँड्लर वरून केले आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या आप्तांना भेटताना सर्वाना शुभेच्छा देताना त्यांनी आपल्या राष्ट्रासाठी आपण सदैव तत्पर राहणार असल्याचे वक्तव्य केले आहे.