पवार म्हणाले! ठाकरेंना मुख्यमंत्री करून मोठी चूक केली ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2021
Total Views |

sharad pawar _1 &nbs
 
 
मुंबई : महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेल्या शरद पवारांचाच फोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून सर्वात मोठी चूक केल्याची भावना शरद पवार यांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे बोलताना व्यक्त केली, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी केला आहे.
 
 
'एकनाथ शिंदे किंवा संजय राऊत यांना मुख्यमंत्री बनवलं असतं तर परवडलं असतं', असे हतबलतेने पवार राऊतांपुढे व्यक्त झाल्याचा गौप्यस्फोट अनिल थत्ते यांनी केला. पाच राज्यांच्या निवडणूक निकालादरम्यान दै.'मुंबई तरुण भारत व सा.विवेक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पश्चिम बंगाल ते पंढरपूर' या चर्चासत्रात ते बोलत होते.
 
 
 
थत्ते म्हणाले की, "बाळासाहेबांनी स्वबळावर सत्ता आणली नाही, शरद पवार हे कधी महाराष्ट्राचे ममता बॅनर्जी होऊ शकले नाहीत. उद्धव ठाकरेंना ते शक्यच नाही. शरद पवारांनी आयुष्यभरात कधी ५२-५५ आमदारांच्या पुढे सत्ता आणली नाही. शिवसेनेला ते शक्य नाही आणि ममता बॅनर्जीं महाराष्ट्रात येऊन त्यांच्या तारणहार बनतील, अशी अपेक्षाही नाही."
 
 
"ममतांची राजकीय शैली महाराष्ट्राच्या पचनी पडणारी नाही. त्यामुळे महाविकास आघाडीकडे फडणवीसांच्या विरोधात उभा करण्यासाठी एकही सक्षम नेतृत्व नाही. राज्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये फाटाफूट अटळ आहे ती लवकरच होईल, शिवसेनेतच अनेक जण नाराज आहेत. सेना आतून पोखरली गेली आहे. पक्षांतर्गत खदखद आहे.", असा दावाही थत्तेंनी केला आहे.
 
 
ऐका राजकीय थत्ते!
 
महाMTB आणि सा.विवेक आयोजित विशेष मुलाखतीत ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी आपल्या खास शैलीत राज्यातील राजकारणातील परिस्थितीवर परखड भाष्य केले आहे. ही संपूर्ण UNCUT मुलाखत लवकरच दै.मुंबई तरुण भारतच्या ऑनलाईन वेब पोर्टल 'महाMTB'वर प्रसिद्ध केली जाईल. मुलाखत पाहण्यासाठी युट्यूब चॅनल आणि फेसबूक पेजला नक्की लाईक करा....


@@AUTHORINFO_V1@@