नक्षलवाद विरोधी कारवाईला मोठं यश

    29-Mar-2021
Total Views | 132


naxal _1  H x W

 

गडचिरोली : गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरुद्ध कारवाईला मोठं यश आलंय. कुरखेडा उपविभागातील मालेवाडा परिसरातील खोब्रामेंंढा जंगलात सोमवार दिनांक २९ रोजी सकाळी झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाल्याची घटना घडली आहे.सोमवारी सकाळी ७.३० ते ८ च्या सुमारास त्याच परिसरात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी पोलिस कारवाईत ठार झाले असुन त्यात ३ पुरूष आणि २ महिला नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी याला दुजोरा दिला आहे.
 
सलग दोन दिवसांपासुन या भागात चकमकी उडत होत्या.शनिवारी सकाळी पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकात आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. यावेळी नक्षलवाद्यांचा कॅम्प उध्वस्त करत पोलिसांनी घातपाताचा कट उधळून लावला होता. यानंतर त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले.सोमवारी सकाळी ७.३० ते ८ च्या सुमारास त्याच परिसरात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी पोलिसांच्या गोळीचे शिकार झाले. त्यात ३ पुरूष आणि २ महिला नक्षलवादी असल्याचे समजते.
 
नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांकडून घातपात घडविण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना मिळाली होती.नक्षलवाद्यांच्या कारवाया नियंत्रणअत आणण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वाखाली खोब्रामेंढा, हेटाळकसा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित आहेत. ठार झालेल्या पाचही नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. 


 



 

अग्रलेख
जरुर वाचा
हार्वर्ड विद्यापीठातील वाढत्या इस्लामिक कट्टरतावादी हालचालींना ट्रम्प सरकारचा दणका!

हार्वर्ड विद्यापीठातील वाढत्या इस्लामिक कट्टरतावादी हालचालींना ट्रम्प सरकारचा दणका!

(Trump freezes $2bn in Harvard funding) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक मोठ्या निर्णयांचा धडाका लावला आहे. या निर्णयांमुळे अमेरिकेसह जगभरातील देशांना चांगलेच धक्के बसले आहे. आंतरराष्ट्रीय धोरणांबाबत घेतलेल्या निर्णयांबरोबरच देशाअंतर्गतही त्यांनी काही मोठे निर्णय घेतले आहेत. आता ट्रम्प यांनी आपला मोर्चा शिक्षणसंस्थाकडे वळवला आहे. जगद्विख्यात हार्वर्ड विद्यापीठाचे २.२ अब्ज डॉलर्सहून (सुमारे १८ हजार कोटी रुपये) अधिक शैक्षणिक निधी गोठवला आहे. विद्यापीठात सातत्याने..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121