उद्धव ठाकरे सरकारला विचारला जाब !
संभाजीनगर : भित्तीचित्रे, पुस्तके, नोंदवही आणि अर्ज आणि धर्मपरिवर्तनासाठी लागणारा सर्व मालमसाला घेऊन काही कट्टरपंथींनी दिवसाढवळ्या दुकान खुले केले होते. हा प्रकार स्थानिक तरुणांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने सर्व साहित्य उधळून लावत सर्वांना या भागातून हुसकावून लावण्यात आले आहे.
एन १२ डी स्वामी विवेकानंद नगर पार्क, संभाजीनगर (औरंगाबाद) या जागेसमोर हा प्रकार सुरू होता. थोडी चौकशी केल्यावर त्यातील उर्दू पत्रके आणि फॉर्म आढळून आले. तरुणांनी संबंधित व्यक्तीला जाब विचारत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. एका व्हायरल व्हीडिओमध्ये स्थानिकांनी त्यांचे स्टॉल्स उधळून लावत हे प्रकार इथे खपवून घेतले जाणार नाहीत, असा दम सर्वांना दिला आहे.
सोशल मीडियावर याबद्दलचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी याविरोधात संताप व्यक्त केला आहे. लेखिका शेफाली वैद्य यांनी याविरोधात आवाज उठवला आहे. हिंदूत्वाचा विचार घेऊन जाणाऱ्या ठाकरे सरकारच्या राज्यात दिवसाढवळ्या अशाप्रकारचे गोरखधंदे सुरू असल्याबद्दल त्यांनी महाविकास आघाडीला जाब विचारला आहे. वैद्य यांनी संबंधित तरुणांनी दाखवलेल्या धाडसाचे अभिनंदनही केले आहे.