राठोड राजीनामा देणार का ?
मुंबई : स्वतःला बंजारा समाजाचे नेतृत्व मानणारे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा काही क्षणातच उद्धव ठाकरे स्वीकारतील, अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी राठोड यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर चर्चगेट येथील निवासस्थानी राठोड दाखल झाले आहेत. राठोड यांच्यातील दोन तास चर्चा झाली. त्यांनी राजीनामा दिला की नाही याबद्दल अद्याप स्पष्टता झालेली नाही. मात्र, राठोड यांचा राजीनामा स्वीकारण्याची वेळ आता महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांवर का आली आहे त्याची 'ही' आहेत कारणे!
१. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचे थेट नाव
२. राज्य सरकारच्या एका महत्वाच्या मंत्र्याचे नाव एका मुलीच्या हत्या प्रकरणात आल्याने नैतिकतेचा प्रश्न निर्माण होतो.
३. पूजा प्रकरणाशी संबंध नसताना राठोड यांनी शक्ती प्रदर्शन का केले ?
४. १५ दिवस राठोड अज्ञातवासात का होते ?
५. शिवसेनेच्या महिला आघाडीबद्दल प्रश्न चिन्ह : इतर कुठल्याही प्रकरणी ज्यावेळी महिलांचे प्रश्न येतात त्यावेळी महिला शिवसैनिक निषेध व्यक्त करण्यासाठी आघाडीवर असतात. मात्र, राठोड प्रकरणात कुठल्याही महिला नेत्याने प्रतिक्रीया दिली नाही.
६. राठोड यांच्यावर महाविकास आघाडीतील सर्व नेते नाराज असल्याची चर्चा आहे.
७. पूजाच्या लॅपटोपमध्ये आढळलेल्या फोटोंवरून तसेच रेकॉर्डींगवरून संशय बळावत आहे.
८. शक्तीप्रदर्शन करून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा करून चुकीचा पायंडा राठोड यांनी पाडला.