अकोला : अमोल मिटकरी यांचा स्वतःच्या गावातच पराभव झाल्याने त्यांना मोठा धक्का मानला जात आहे. राज्यमंत्री बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेने यश मिळवल आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत आहेत. अमोल मिटकरींच्या गावातच राष्ट्रवादीचा पराभव झाला असून, बच्चू कडूंच्या प्रहारचा दिमाखात विजय झाला आहे. मिटकरी यांनी मात्र, जनसंपर्क न ठेवल्याने त्यांचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे.
पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांची कुरबुरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. तिन्ही पक्ष वेगळे लढून त्यांना पराभव पदरी आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर भाजपसोबत हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप केला होता. आमदार मिटकरी यांच्या कुटासा गावाच्या पोटनिवडणुकीत हात मिळवणी केल्याचा आरोप मिटकरी यांनी केला होता. दरम्यान यासंदर्भात मिटकरी हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राज्यातील तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आणि एकूणच महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहता शिक्षण बच्चू कडू ‘प्रहार’ पक्ष आपली ताकद लावली आहे. प्रहार पक्षाला पहिल्यांदाच मंत्रीपद मिळाले. मंत्रिपदाचा फायदा पक्ष संघटनेसाठी करुन घेत ‘प्रहार’ची राज्यभर वेगानं सदस्य नोंदणी सुरू झालीय शिवाय बच्चू कडू यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते ठिकठिकाणी शाखा गठीत करत आहेत. बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीची पक्षाच्याच जागा बळकावण्याची रणनिती तर आखली नाही ना, असा प्रश्न सध्या आहे.