कर्करोगाशी झुंज अपयशी ! या अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप

    10-May-2020
Total Views | 205
SAI GUNDEWAR_1  




लॉस अँजलिस
: हरहुन्नरी अष्टपैलू युवा अभिनेता साईप्रसाद गुंडेवार हा गेली दोन वर्ष 'ग्लायोब्लास्टोमा' (ब्रेन कॅन्सरने) त्रस्त होता. २२ फेब्रुवारी २०१९ रोजी म्हणजेच त्याच्या वाढदिवसालाच अमेरिकेतील लॉस अँजेलिस येथील रुग्णालयात त्याच्यावर कर्करोग शस्त्रक्रीया झाली होती. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. रविवारी दिनांक १० मे २०२० रोजी सकाळी ७:३० वाजता त्याची प्राणज्योत मालवली. त्याचा जन्म नागपूर येथील असून तो ४२ वर्षांचा होता. 
साई गुंडेवार यांनी एम टीव्हीच्या Splitsvilla, Season 4, स्टार प्लसवरील Survivor तसेच अमेरिकेतील लोकप्रिय S.W.A.T., Cagney and Lacey, The Orville, The Mars Conspiracies,The Card मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये त्याने 'रॉक ऑन', 'पप्पू कान्ट डान्स साला', 'लव्ह ब्रेकअप जिंदगी', 'डेव्हिड', 'आय मी और मैं', 'पीके', 'बाजार' इत्यादी हिंदी चित्रपटांसोबतच काही हॉलिवूडच्या चित्रपट व लघुपटांमध्ये त्याने विविध भूमिका केल्या आहेत. तसेच डॉ. मीना नेरुरकर यांच्या 'ए डॉट कॉम मॉम' या एकमेव मराठी चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका केली आहे. फॅशन डिझायनर सपना अमीन यांच्यासोबत २०१५ रोजी साई यांचा विवाह झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी सपना, आई शुभांगी, राजश्री, वडील राजीव असा परिवार आहे. अतिशय तरुण वयात त्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
भारतात प्रत्यार्पणाच्या चर्चा, तहव्वूर राणा नेमका आहे कोण? २६/११ च्या हल्ल्यात त्याची काय भूमिका होती? सविस्तर वाचा...

भारतात प्रत्यार्पणाच्या चर्चा, तहव्वूर राणा नेमका आहे कोण? २६/११ च्या हल्ल्यात त्याची काय भूमिका होती? सविस्तर वाचा...

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणा याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर भारताने त्याचे प्रत्यार्पण व्हावे यासाठी अनेक प्रयत्न केले होते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला, त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या प्रत्यार्पणास हिरवा कंदिल दाखवला होता. मात्र तहव्वूर राणाकडून प्रत्यार्पण टाळण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात होते. त्याने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121