नगरसेवकपदाचे मानधन मदतनिधीत देण्याचा विक्रांत पाटील यांचा निर्णय

    09-Apr-2020
Total Views | 102



Vikrant Patil_1 &nbs



दोन महिन्यांचे मानधन महापौर निधीसाठी


पनवेल (दि. ८) : कोरोना संकटाचा सामना करताना मंत्री, खासदार यांच्या वेतनात कपात झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या आहेत. महाराष्ट्रातील आमदारांचे मानधन आकस्मिक निधीत देण्याचा निर्णय राजकीय पक्षांनी घेतला होता. मात्र नगरसेवकांनी आपले मानधन मदतनिधीत देण्याची ही नवी सुरुवात आहे. विक्रांत पाटील यांनी याबाबत पुढाकार घेतला असून मानधन मदतनिधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.


पनवेल मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व भाजपच्या युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी आपले दोन महिन्याचे मानधन महापौर निधीसाठी देण्याचा निर्णय केला आहे. त्याकरिताचे पत्र विक्रांत यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहे. महानगरपालिका प्रशासन या नात्याने उत्तम काम करीत आहे, सध्या सर्वच यंत्रणांवर ताण येतो आहे त्यामुळे एक मदत म्हणून हे मानधन स्वीकारण्यात यावे, अशी विनंती विक्रांत पाटील यांनी केली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121