कोरोना काळात गरजूंना आपल्याकडून मदत व्हावी, या प्रामाणिक दृष्टिकोनातून पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ४ चे नगरसेवक व तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी मदतीचा हात दिला. अनेक गरीब कुटुंबावर संकट कोसळले होते. यावेळी त्यांनी स्वत:च्या मदतीसह रामशेठ ठाकूर आणि आ. प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली मदतही प्रभागात दिली. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...
नाव : प्रवीण काळूराम पाटील
राजकीय पक्ष : भाजप
प्रभाग क्र. : ४,
पद : नगरसेवक, तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष
संपर्क क्र. : ९८२०८५३४०४
“कोरोना सुरू झाल्यापासून आम्ही नगरसेवक लोकांना मदत करत होतो. प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन फवारणी करून, सॅनिटायझरचे वाटपही सुरु होते. त्यावेळी लोकांना घराबाहेर पडायला बंदी होती. पण, अनेक जण काहीही माहीत नसताना, न बघताच ‘तुमचे आमदार कुठे आहेत? नगरसेवक कुठे आहेत? असे म्हणायचे. त्यावेळी मनाला फार दु:ख वाटायचे. वेदना व्हायच्या,” असे पनवेल महापालिका प्रभाग क्र. ४ चे नगरसेवक व स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील म्हणतात.
कोरोना सुरू झाल्यावर सुरुवातीला नगरसेवक प्रवीण पाटील हे स्वत: आपल्या प्रभागात फिरून लोकांना काळजी घेण्याबाबत माहिती देत होते. आ. प्रशांत ठाकूर यांनी लोकांचे होणारे हाल पाहून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आता आपण घरात न बसता, बाहेर पडून मदत करायला पाहिजे, असे आवाहन केल्यावर त्यांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदत देण्यास सुरुवात केली. आ. प्रशांत ठाकूर यांनी आपल्याला नेहमी उपयोगी पडणार्यांची यादी तयार करण्यास सांगितली. त्याप्रमाणे यादी तयार केली. त्यांना अन्न-धान्याच्या किटचे वाटप सुरू केले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मास्कचे, सॅनिटायझरचे वाटप, रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे वाटप पोलीस ठाणे, पेट्रोल पंपावरील कर्मचार्यांनाही केले. खारघरमध्ये ‘मोदी किचन’च्या माध्यमातून ४३ दिवस रोज हजारांपेक्षा जास्त लोकांना जेवण पुरवण्यात येत होते. या कामात नगरसेवक प्रवीण पाटील हे दररोज सक्रिय भाग घेऊन लोकांना जेवण देण्याचे काम करीत असत.
पनवेल महानगरपालिकेत समावेश झालेले खारघर हे ‘स्मार्ट सिटी’ आणि ‘एज्युकेशन हब’ म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी उच्चवर्गीय, मध्यमवर्गीय आणि मजूरवर्ग अशी सर्व प्रकारची वस्ती आहे. येथील बहुसंख्य नागरिक मुंबईला नोकरी-धंद्यासाठी जातात. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील अनेकांचा समावेश असल्याने खारघरमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत होते. त्यामुळे रुग्ण सापडल्यावर त्या सोसायटीतून फवारणी करण्याची मागणी केली जात असे.
म्हणून तेथे नगरसेवक प्रवीण पाटील यांनी महापालिकेतर्फे सोसायटीत फवारणी करून घेतली. त्यांनी स्वत: दिवस आपल्या कार्यालयाजवळ २० दिवस अन्नछत्र चालवले. ५०० लोकांना अन्न-धान्याचे किट तयार करून वाटले. रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने स्वत:च्या गाडीतून रुग्णांना दवाखान्यात नेले. त्यांना बेड उपलब्ध करून दिले.
एके दिवशी दुपारी एका ६० वर्षीय व्यक्तीला बेड मिळत नसल्याचा फोन आला. नगरसेवक प्रवीण पाटील यांनी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केले, पण त्यांना बेड मिळाला नाही. त्यावेळी ऑक्सिजन न मिळाल्याने त्या व्यक्तीचा आपल्यासमोर झालेला मृत्यू पाहून आपण महापालिकेमार्फत ऑक्सिजन बेड जास्तीत जास्त कसे उपलब्ध करून देता येतील, यासाठी स्थायी समिती अध्यक्ष म्हणून आ. प्रशांत ठाकूर यांच्यामार्फत प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.
"लोकांनी कोरोना संपला असे समजून वागू नये. पुन्हा ‘लॉकडाऊन’ करण्याची वेळ आली तर कोणालाही परवडणार नाही, याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी."
त्यामुळे आज हॉस्पिटलची संख्या वाढली आणि बेड उपलब्ध होऊ लागले. त्यांना यासाठी सभागृह नेते परेश ठाकूर, तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख, आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त संजय शिंदे, महाले आणि खारघर येथील आरोग्य खात्याचे पंकज तितर यांची चांगली साथ लाभली.
या काळात प्रवीण पाटील यांच्या घरातील आठ माणसांपैकी मुलगी, भाऊ, पत्नी आणि प्रवीण पाटील हे स्वत: दोन वेळा कोरोना ‘पॉझिटिव्ह’ झाले. त्या काळातही मदत मागायला लोक घरी येत होते. पण, तरीही घरच्यांनी विरोध केला नाही, फक्त काळजी घेण्यास सांगितले. त्यांच्या खारघर गावात तीन हजार खोल्या आहेत. त्यामध्ये ७० टक्के परप्रांतीय राहत आहेत. त्यांना रेशनची गरज होती. त्यांना प्रवीण पाटील यांच्या कार्यालयासमोर लागलेली लोकांची रांग पाहून याठिकाणी रेशन वाटप होते, असे वाटायचे म्हणून ते लोकही रांग लावायचे. मग त्यांच्यासाठीही किट तयार करून त्याचे वाटप करण्यात आले.

यासाठी त्यांना नेहमी अनिल साबणे, विशाल नाईक, पिंटू पाटील, अंबालाल पटेल, सानिया पावस्कर या कार्यकर्त्यांची मदत होत असे. त्यांच्याबरोबर कृष्णा पळी हे भाजपचे जुने कार्यकर्ते वाटप करण्यासाठी नेहमी असायचे, पण कोरोनामध्ये त्यांचे दु:खद निधन झाले. तसेच याकामी रामशेठ ठाकूर सामाजिक संस्थेचे चांगले सहकार्य मिळाले. इतर संस्था मात्र ४०-५० लोकांना मदत देऊन फोटो काढून जायच्या. त्यामुळे मदत घेण्यासाठी आलेले शेकडो लोक नाराज होऊन जायचे. पण, पाटील यांनी आपल्या मदतीचा फार गाजावाजा न करता गरजूंना वेळेवर मदत कशी पोहोचेल, याकडेच लक्ष केंद्रीत केले.