विनयभंगाच्या गुन्ह्यात अभिनेता विजय राजला अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2020
Total Views | 123

Vijay Raaj_1  H
 
 
नवी दिल्ली : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विजय राजविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली होती. यामुळे बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. आगामी चित्रपट 'शेरनी' या चित्रपटाच्या शूटिंग क्रूमधील महिलेची छेडछाड केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून विजय राजला पोलिसांनी अटक केली आहे.
 
 
अभिनेत्री विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेल्या 'शेरनी' या चित्रपटाचे शूटिंग गोंदिया शहरापासून जवळ असलेल्या मध्य प्रदेशातील बालाघाट येथे सुरू आहे. यासाठी चित्रपटाचा संपूर्ण क्रू गोंदियातील हॉटेल गेटवेमध्ये गेल्या १५ दिवसांपासून मुक्कामावर आहे. यावेळी काही दिवसांपूर्वी शूटिंग क्रूमधील ३० वर्षीय महिलेची विजय राजने छेडछाडकेल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली होती.
 
 
शूटिंग क्रूमधील महिलेने दिलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी कलम ३५४ (अ,ड) अन्वये गुन्हा दाखल करुन विजय राजला अटक करण्यात आली. याप्रकरणाविषयी पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. हॉटेल गेटवे प्रशासनाकडूनही सारवासारव करण्यात येत असून पत्रकारांनाही हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@
जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..