वाशीम : महाराष्ट्र राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर आपली प्रक्रिया व्यक्त केली आहे. "अब्दुल सत्तार यांचा राजीनामा म्हणजे ठाकरे सरकारच्या पतनाची सुरुवात सरकार बनवण्याआधीच सुरु झाली आहे." असा घणाघात फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. वाशिममध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
अधिक माहितीसाठी हेही वाचा...
'आज अशा बऱ्याच बातम्या येतील': चंद्रकांतदादा पाटील"राज्यात स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार हे जनतेच्या कामासाठी झाले नाही, तर मलई खाण्यासाठी झाले आहे. आधी विस्तार होत नव्हता, मग नंतर खातेवाटप झाले नाही. आज तर एका मंत्र्यानेच राजीनामा दिला म्हणजे या सरकारच्या पतनाची सुरुवात सरकार बनण्याआधीच सुरु झाली आहे." असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला. यापुढेही असेच नाराज आमदार राजीनामे देऊन हे सरकार कोसळेल असा दावा यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
अधिक माहितीसाठी हेही वाचा...
सुधीर मुनगंटीवारांचेही टीकास्त्र
अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी देखील टीका केली आहे. “सत्तारांचे राजीनामानाट्य या सरकारचे खरे रूप दर्शविणारे आहे. यांना महाराष्ट्राच्या विकासाशी सोयरसुतक नाही, राज्यासाठी आता ‘मातोश्री’चे सेल झालेत डाऊन, बाप-बेटा मामा-भांजे की सरकार, आपले तत्व आणि आदर्श गुंडाळून ठेवणाऱ्यांची हीच अवस्था होईल”, असा घणाघात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला.