अनेक चर्चा आणि अफवांना पूर्णविराम देत दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी अखेर 'हंगामा २' च्या सिक्वेलची घोषणा केली. मंगळवारी चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मिडीयावरून प्रदर्शित करत त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली.
'हंगामा २'मध्ये परेश रावलसह अभिनेत्री शिल्पा शेट्टी, प्रणिता सुभाष, आणि मिझान जाफरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. बऱ्याच वर्षांनी शिल्पा शेट्टी या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. मिझान जाफरी हा अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा असून तो याआधी 'मालाल' या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकला होता.
Ready for Confusion Unlimited? Priyadarshan & Ratan Jain return with reboot of everyone's favorite comedy entertainer #Hungama2 Produced by @rtnjn Hungama2 will release on 14 Aug@priyadarshandir @SirPareshRawal @TheShilpaShetty @MeezaanJ @pranitasubhash #Venus @hungama2film pic.twitter.com/3ASjoydxmD
— Paresh Rawal (@SirPareshRawal) December 24, 2019