माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
गोगलगायीची वाढ तिचे खाणे, पाण्यातील आम्लाचे प्रमाण आणि पाण्याचे तापमान यावर अवलंबून असते. गोगलगायीच्या शरीरावरचा चिकटपणा किंवा श्लेष्म हा त्यांना सुकण्यापासून वाचवतो. जर ५० टक्क्यापेक्षा जास्त पाणी त्यांच्या शरीरातून वाळून गेले तर त्यांचा मृत्यु होऊ शकतो म्हणून हा श्लेष्म त्यांना सतत ओले ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. जमिनीवरच्या काही जातीच्या गोगलगायींना शिंगांच्या दोन जोड्या असतात, अर्थातच ही शिंगे मऊ आणि नरम असतात. ह्यातील लांब शिंगांच्या टोकावर त्यांचे डोळे असतात आणि ही शिंगे त्या डोळ्यासकट ते आत शरीरात ओढून घेऊ शकतात. दुसरी शिंगाची जोडी ही आखुड आणि जाडसर असते. हिचाउपयोग वास घेण्यासाठी आणि आजूबाजूच्या परिसराला स्पर्श करण्यासाठी, त्याचे ज्ञान मिळवण्यासाठी होतो. निसर्गात ह्या गोगलगायी सडलेल्या भाज्या अथवा पाने, बुरशी, अळंबी, सडलेले लाकूड वगैरे खातात.
‘गोगलगाय आणि पोटात पाय’ असे म्हणातात पण हीच गोगलगाय काहींच्या पोटातही जाते. भारतातील काही दुर्गम भागात गोगलगायी हा प्रकार चुलीवर शिजवून खाल्ला जातो. त्याला snail curry (गोगलगायीचा रस्सा) असेही म्हणतात. ही ‘snail curry’ बनवताना गोगलगायीच्या पाठीवरील शंख व गोगलगाय हे ओढून एकमेकांपासून वेगळे केले जातात. त्यानंतर गोगलगायीला विळीवर क्रूरतेने चिरले जाते. नंतर हे तुकडे चुलीवर शिजवले जातात. गोगलगाय हा पर्यावरणातील एक उपयुक्त घटक आहे. दिवसेंदिवस या प्रजातीतील गोगलगायींची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे गोगलगाय आपल्याला दिसणे आजकाल फार दुर्मिळ झाले आहे.
खरे म्हणजे पर्यावरणातील कीटक हा फार दुर्लक्षित घटक आहे. साधारणत: आकाराने लहान आणि सहज नजरेला न दिसणारे सजीव पायीखाली चिरडले गेल्यावरच त्यांची जाणीव होते. काही माणसे तर स्वत:च्या मनोरंजनासाठी गोगलगाय दिसली की तिच्यावर मीठ टाकतात. सेंद्रिय पदार्थाच्या शरीरातील अभावामुळे गोगलगाय हा दाह सहन करू शकत नाही व परिणामी तिचा मृत्यू होतो. अतिशय नाजूक व स्वत:च्या शरीराचे घर करून राहणारी गोगलगाय ही पर्यावरणातून लोप पावतो की काय अशी भीती निर्माण होत आहे.
- पराग गोगटे
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
विधान परिषद आश्वासन समितीच्या समिती प्रमुख पदाचा दरेकरांनी पदभार स्वीकारला..