'पोटनिवडणुकांमध्ये महाराष्ट्रातीलच ईव्हीएमचा वापरा करावा'

    27-May-2018
Total Views | 25

जयंत पाटील यांची मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी



गोंदिया : भंडारा-गोंदिया येथील लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातीलच ईव्हीएम मशीन्सचा वापर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. निवडणुकांसाठी वापरल्या जाणाऱ्या मशीन्स या खराब असल्याचा दावा पाटील यांनी केला असून मतदानासाठी राज्यातीलच मशीन्सचा वापर करण्यात यावा, असे पाटील यांनी म्हटले आहे.

पाटील यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून याविषयी माहिती दिली आहे तसेच आवाहन केले आहे. या पोटनिवडणुकांमध्ये मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीन्स या गुजरात आणि सुरतहून मागवण्यात आल्या आहेत. परंतु या मशीन्सची तपासणी केली असता यातील बऱ्याचशा मशिन्स या खराब असल्याचे निदर्शनात आलेले आहे. त्यामुळे गुजरात आणि सुरतहून मागाव्यात आलेल्या कोणत्याही इव्हीम मशीनचा वापर मतदानासाठी करण्याऐवजी महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या मशीन्स वापर मतदानासाठी करण्यात यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. याचबरोबर मतदानात वापरल्या जाणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीन्स देखील अत्यंत धीम्या असून त्यामुळे मतदाराला पावती मिळण्यास उशीर होत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे आयोगाने याकडे देखील लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
२० वर्षांच्या वक्फ संपत्तीचे भाडे जात होते पाच मुस्लिम प्रस्थापितांच्या घशात; वक्फ सुधारणा कायद्यामुळे काळाबाजार आला समोर, संबंधितांनी भाजप सरकारचे केले कौतुक!

२० वर्षांच्या वक्फ संपत्तीचे भाडे जात होते पाच मुस्लिम प्रस्थापितांच्या घशात; वक्फ सुधारणा कायद्यामुळे काळाबाजार आला समोर, संबंधितांनी भाजप सरकारचे केले कौतुक!

Waqf Board गुजरात राज्यातील असलेल्या अहमदाबादमध्ये वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) कोट्यवधि दुकानाच्या जमिनीवर अवैधपणे दुकाने बांधली होती. यावरून संबंधितांनी वक्फचे विश्वस्त असल्याचा दावा केला आणि दुकाने भाड्याने दिली आणि २० वर्षांपूर्वीचे असलेले भाडे वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित भाडे हे वक्फ बोर्डाच्या खात्यावर जाण्याऐवजी पाच व्यक्तींच्या खिशात जात असल्याची माहिती समोर आली आहे. या संबंधित प्रकरणाची माहिती ही वक्फ बोर्डाला कळाल्याची माहिती तक्रारीत नमूद केले होते. मात्र, तरीही कारवाई करण्यात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121