कशासाठी? कचऱ्यासाठी!

    13-Jul-2017
Total Views | 7


 

मी अगदी नियमितपणे तरुण भारत मधील ‘नाद बागेश्री’ हे सदर वाचत असते. मध्यंतरी पर्यावरण दिनानिमित्त 'कचऱ्यापासून खत आणि ऊर्जा निर्मिती' हा लेख वाचला. त्या लेखातून समाजातली तुमच्या आमच्या सारखी सामान्य माणसे, Plastic कसे recycle करतात याची माहिती होती. 

तो लेख वाचून आपणही थोडीशी इच्छाशक्ती वाढवण्याची गरज आहे असं वाटलं मला. खरंच! किती निरनिराळे उपाय होते आणि केवढा मोठा social cause हाताळत होती ती सगळी लोकं. कोणी Plastic Polyfuel तयार करत होतं, कोणी छोटे packaging pouches, तर कोणी recycled प्लास्टिक पासून dustbins तयार करत होते. एक उपाय तर इतका सोपा होता- एक गृहिणी त्यांच्या घरामध्ये आलेली प्रत्येक plastic पिशवी जपून ठेवत आणि नेहमीच्या भाजी विक्रेत्याला देतात.अशा प्रकारे एक पिशवी किमान दोनदा वापरली जाते.

लेख वाचल्यावर स्वस्थ बसवेना. आपणही काहीतरी केलं पाहिजे कचऱ्यासाठी, असं वाटू लागलं. पण नेमकं काय करावं ते समजेना. मग साम्राज्यच्या kids summer camp चं निमित्त झालं आणि सगळ्या बाळगोपाळांसाठी plantation ideas चा भाग म्हणून घरातल्या ओल्या कचऱ्यापासून तयार झालेलं कंपोस्ट वापरून मी मातीचे 50-60 balls तयार करून दिले. माती, शेण, कंपोस्ट, राख, थोडं ओलं गवत आणि पाणी असं mix करून लाडू वळले. त्यात एक आंब्याची बाठ किंवा 2-3 जांभूळ बिया घातल्या. आणि हे seed ballsटेकडीवर पाऊस येण्या अगोदर निरनिराळ्या ठिकाणी टाकायचे अशी योजना होती. म्हणजे नुसत्या बिया टाकण्यापेक्षा या balls मुळे बी रुजण्यासाठी मदत होईल आणि बिया वाळून वाया जाणार नाहीत. आमच्या सोसायटीतल्या सगळ्या छोट्या दोस्तांनी मोठ्या उत्साहाने टेकडीवर जाऊन ते balls सर्वत्र विखुरले.

एवढं सगळं झाल्यावर एक मात्र वाटलं की हे spoon feeding होतंय. सगळं जर आपण आयतेच बनवून दिलं त्या मुलांना तर त्यांना स्वतःहून काहीतरी केल्याचं समाधान कसे मिळेल? आणि त्याही पेक्षा हे सगळं करावं यासाठी जी इच्छाशक्ती पाहिजे ती जागृत करण्यासाठी कमी पडले मी, असं वाटलं.

हे सगळे विचार मनात घोळत होते तेव्हा, अक्षराला काय वाटलं काय माहित. मला म्हणाली, "आई, आज जेवताना नवीन गाणं म्हण हं!" मी सुद्धा नुसतंच "बरं" म्हटलं. खरं म्हणजे एरव्ही ती असं म्हणाली की मी google करून एखादं बडबडगीत शोधते. पण त्या दिवशी तसं करावंसं नाही वाटलं कारण मनात काहीतरी तयार होत होतं.

मग मीच एक बडबडगीत लिहिलं.

एक होती माऊ, 

खात होती खाऊ. 

खाऊ कुठला माहितीये का? 

तुम्ही आम्ही टाकलेला. 

कचऱ्याच्या पेटीतला.  

त्या कचरा पेटीत होत्या,  

खूप प्लास्टिकच्या पिशव्या.

माऊने खाऊ म्हणत म्हणत 

त्या सुद्धा खाऊन टाकल्या!

मग? मग काय विचारता? 

तिच्या पोटात आला गोळा! 

पोट लागलं दुखायला, 

डॉक्टरकडे नेली तिला!

डॉक्टर काकांनी लावला हात 

मनी माऊच्या पोटाला. 

म्हणाले, अशा कशा गं पिशव्या

आल्या तुझ्या वाट्याला?

कोणी कोणी टाकल्या कचऱ्या मध्ये पिशव्या?

अक्षराने, अस्मिने की अवनीने फेकल्या?

वरदने ओला कचरा केला का वेगळा?

नभाने प्लास्टिक ठेवला का वेगळा?

प्लास्टिक recycle करुया,  

ओला कचरा जिरवूया! 

प्लास्टिकला बाय बाय करूया, 

जिरेल तीच वस्तू विकत आणूया.

माऊला प्रेमाने बोलावू या, 

छोट्या चांगल्या सवयींनी 

कचरामुक्त होऊ या!

 

गाण्याला छानशी चाल लावली आणि जेऊ घालतांना दोघांना म्हणून दाखवलं. गंमत  म्हणजे दोघे लक्ष देऊन ऐकत होते आणि दोघांच्याही डोळ्यात काहीतरी नवीन समजल्याचे भाव दिसले मला. एक दोनदा म्हणून दाखवलं तरी माझा दीड वर्षाचा मुलगा परत परत म्हणून दाखवण्यासाठी मागे लागला. पण अक्षरा एकदम शांत झाली आणि बारीक चेहरा करून बसली. 
माझ्या लक्षात आल्यावर मी तिला म्हटलं, "काय झालं? तुला आवडलं नाही का गाणं?" तर म्हणाली, "नाही आवडलं!" मग मी विचारलं, "काय नाही आवडलं?" तर म्हणाली, "तू कशाला माझं नाव घेतलंस प्लास्टिक पिशव्या फेकते म्हणून, मी नाही फेकत प्लास्टिक पिशव्या".

मी जवळपास युरेका!! असं जोरात ओरडण्याचं बाकी ठेवलं होतं. गाण्यात सुद्धा माझ्या एवढ्याशा मुलीला ती प्लास्टिक पिशवी कचऱ्यात फेकते आणि त्यामुळे मनीमाऊला त्रास होतो, ही कल्पना नकोशी झाली होती. म्हणजे माझ्या या युक्तीमुळे जे साधायचं होतं ते बऱ्यापैकी साध्य झालं होतं.


- अमिता देव

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121