प्रेमाच्या नव्या व्याख्येचा प्रवास; 'माझी प्रारतना'चे पहिले पोस्टर प्रदर्शित!

    07-Mar-2025
Total Views | 29
 
 
an unbelievable love story unfolds first look of mazi prarthana revealed
 
 
 
मुंबई : प्रेमाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. प्रेम कोणत्याही सीमा मानत नाही. वय, जात, रूप, किंवा स्वरूप याला प्रेमाची अडचण नसते. दोन हृदयांमधील सुंदर बंधन म्हणजे प्रेम, आणि लवकरच एक अशक्यप्राय प्रेमकथा चित्रपट रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. "माझी प्रारतना - अकल्पनीय प्रेमकथा", लेखक व दिग्दर्शक पद्माराज राजगोपाल नायर यांचा हा नवा मराठी चित्रपट, प्रेमाच्या कच्च्या आणि तीव्र भावनांना समोर आणणारा आहे, जो तुमच्या हृदयाला हादरवून टाकेल.
 
 
ब्रिटिश काळात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात घडणारी ही संगीतप्रधान कथा आहे, जी प्रेम, विश्वासघात आणि जगण्याच्या जिद्दीचा अद्भुत प्रवास मांडते. ही प्रेमकथा इतकी ताकदीची आणि हृदयस्पर्शी आहे की, वादळासारखी तुमच्यावर आदळेल तुम्हाला स्तब्ध आणि भारावून टाकेल. जीवनात कितीही दुःख असली तरी प्रेम अंतिम सत्य असते, आणि हा मन हेलावून टाकणारा प्रवास तुम्हाला दाखवेल की प्रेम हीच सर्वकाही जिंकण्याची खरी ताकद आहे.
 
 
'माझी प्रारतना - अकल्पनीय प्रेमकथा' ९ मे २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पद्माराज राजगोपाल नायर आणि अनुषा अडेप मुख्य भूमिका साकारत आहेत, तसेच मराठीतील अनेक दिग्गज कलाकार देखील यात झळकणार आहेत. एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत, पद्माराज नायर फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन पद्माराज राजगोपाल नायर यांनी केले आहे, तर संगीत विश्वजित सी टी यांनी दिले आहे. चित्रपटाबद्दल अधिक माहिती सध्या गुलदस्त्यात असली तरी लवकरच टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित केला जाणार आहे.
 
 
चित्रपटाचा पहिला पोस्टर समोर आल्यानंतर प्रेक्षकांच्या उत्कंठेने उच्चांक गाठला आहे, आणि 'माझी प्रारतना - अकल्पनीय प्रेमकथा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे. आणि हा पोस्टर पाहून नक्कीच प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचलाय, तर 'माझी प्रारतना - अकल्पनीय प्रेम कथा' ९ मे २०२५ ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रातील ओव्हरहेड वीज तारा पुढील २ वर्षात भुमिगत करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रातील ओव्हरहेड वीज तारा पुढील २ वर्षात भुमिगत करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

( Overhead power lines in Vasai-Virar Municipal Corporation area will be buried in the next 2 years ) वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रातील ओव्हरहेड वीज तारा पुढील २ वर्षात टप्प्या-टप्प्याने भुमिगत करणार अशी माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आमदार राजन नाईक यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना दिली. वसई - विरार महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ओव्हरहेड वायरर्स असल्याने पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे झाडे ओव्हरहेड वायरर्सवर पडून वीज वारंवार खंडित होते. यामुळे या वायरर्..