मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Madhavi Lata on Shami Controversy) रमजानचा महिना सुरु झाला असून या काळात उपवास आणि मनोरंजनाच्या साधनांपासून दूर राहण्याबाबत इस्लाममध्ये सांगितले जाते. असे असतानाही भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी याने उपवास न ठेवल्याने मौलाना शहाबुद्दीन रज़वी बरेलवी यांनी या प्रकरणाची दखल घेत, शामीने शरिया कायद्याचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. यावर हैदराबादच्या भाजप नेत्या माधवी लता यांनी शहाबुद्दीन रज़वी यांना चोख प्रत्युत्तर देत गार करून टाकल्याचं दिसतंय. "मोहम्मद शमी आपल्या देशासाठी खेळतोय याचा अल्लाहला आनंद होणार नाही का?", असा सवाल माधवी लता यांनी केला आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी एका सामन्यादरम्यान शीतप्येय प्राशन करताना दिसून आला, त्यावर मौलाना शहाबुद्दीन रज़वी यांनी आक्षेप घेत शरीया कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले. त्यांच्या मते शामीने शरियतचे नियम पाळत उपवास ठेवायला हवा होता. यावर माधवी लता यांना मौलानाचा चांगलाच समाचार घेतला. त्या म्हणाल्या, "भारतासाठी खेळणे हे शमीचे कर्तव्य आहे आणि त्यावर मौलानाचा कोणताही आक्षेप नसावा. मोहम्मद शमी आपल्या देशासाठी खेळतोय याचा अल्लाहला आनंद होणार नाही का? वास्तविक रमजानच्या काळात मनोरंजनापासून दूर राहण्यास सांगितले जाते मग रमजानमध्ये मौलाना स्वतः क्रिकेट का पाहत होते?