रजमानचे कारण पुढे करत फटाके फोडणाऱ्या हिंदूंवर कट्टरपंथींचा हल्ला
देवी देवतांच्या अवमानासह युवकाचा केला हात फ्रॅक्चर
06-Mar-2025
Total Views | 11
गांधीनगर : गुजरात राज्यातील द्वारका येथे खंभालियात २ मार्च रोजी श्रीनाथ हवेली मंदिराच्या प्रांगणात फटाखे फोडण्यात आले. यामुळे काही कट्टरपंथींनी हिंदूंवर हल्ला केला असल्याची घटना समोर आली आहे. मकसूद, तौसीफ, मोईन आणि फूलकंद अशी हल्लेखोरांची नावे आहेत. हल्लेखोरांनी रमजान सुरू असताना फटाके फोडल्याने हल्ला केला असल्याचे कारण सांगितले. यावेळी आरोपींनी संबंधित हिंदू कुटुंबावर हल्ला केला. यामुळे इतर दोन अल्पवयीन मुलं जखमी झाली आहेत.
संबंधित हल्लेखोरांनी हिंदूंना फटाके फोडू नका अशी सरळ धमकी दिली. त्यानंतर शिवीगाळही करण्यात आली होती. त्यानंतर इतर एका कट्टरपंथी युवकाने आपल्याकडे असणाऱ्या लाकडाने हिंदू युवकावर हल्ला केला. त्यावेळी हिंदू युवकाच्या हाताला जबर मार लागल्याने युवकाचा हात फ्रॅक्टर झाला आहे. त्याचे नाव विपुल असल्याचे सांगण्यात येत आहे.
विपुलच्या भाच्यालाही मुस्लिमांनी जबर मारहाण केली. यावेळी घरातील महिला आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी धाव घेताच कट्टरपंथीयांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यावेळी विपुल आणि जखमी झालेल्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या मते, ठक्कर यांचा एक हात फ्रॅक्चर झाला आणि भाच्याच्या शरीरावर कोणतीही जखम झाली नाही.
पीडित विपुल ठक्कर यांनी केवळ हल्ला केला नाहीतर मंदिर आणि देव देवतांचा अवमानही केला असे ते म्हणाले. त्यावेळी ते म्हणाले की, हल्लेखोरांनी धमकी दिली की, जर फटाके फोडले तर मंदिर कुलूपबंद केले जाईल आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारले जाईल. या प्रकरणात आता पोलिसांनी मकसूद, मोईन आणि तौसीफ यांच्याविरोधात कलम ११५ (२), ११७ (२), ३५२ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली.