बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण; बलिदान मास पाळल्याने सरपंचाला पोटशूळ

    05-Mar-2025
Total Views | 56

Bajrang Dal - Balidan Mas news kolhapur
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Balidan Mas news kolhapur) कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील सरवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रदीप सूर्यवंशी यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. 'तुझा बजरंग दल वगैरे काही चालणार नाही, असल्या फालतू गोष्टी घेऊन माझ्या शाळेत येऊ नकोस’, अशी धमकी देत सरपंचाने प्रदीप सूर्यवंशी यांना मारहाण केल्याचे कळतंय. रणधीर मोरे असे सरपंचाचे नाव असून त्यांनी प्रदीप सूर्यवंशी यांच्या केशकर्तनालयाचीही तोडफोड केल्याची माहिती एका वृत्तातून समोर येत आहे. सदर प्रकरणी सरपंच रणधीर मोरे यांच्या विरोधात राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हे वाचलंत का? : सनातन आणि शीख धर्माचे पवित्र संगमस्थान अयोध्या : हरदीपसिंग पुरी

छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी जे बलिदान दिले त्याची जाणीव सर्वांना असावी म्हणून फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या काळात बलिदान मास पाळला जातो. प्रदीप सूर्यवंशी हे प्रत्येक वर्षी छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळतात, तसेच शालेय विद्यार्थ्यांकडून तो साजरा करून घेतात. बलिदानाचे स्मरण काही विद्यार्थ्यांना ते शाळेत अनवाणी आले होते. आपल्या शाळेत असे काही चालणार नाही, यामुळे रणधीर मोरे यांनी प्रदीप सूर्यवंशींना रोखले, त्यांना मारहाण केली आणि याच रागातून त्यांच्या केशकर्तनालयाचीही तोडफोड केल्याचे स्पष्ट होते आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. याच सहकार क्षेत्राचे जाळे महाराष्ट्रात खूप खोलवर रुजले आहे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे सहकारी वित्तीय संस्था आणि या वित्तीय संस्थांमधील महत्त्वाचा भाग म्हणजे, सहकारी पतसंस्था म्हणजेच सहकारी पतपेढी. सर्वसामान्य माणसांच्या जवळच्या आणि त्यांच्या अर्थकारणातही या पतसंस्थांना आजही जिव्हाळ्याचे स्थान आहे. पण, आज याच पतसंस्थांची चळवळ ही काही गैरप्रकारांमुळे संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. त्यानिमित्ताने पतसंस्थांच्या अर्थकारणाचा, ..