छावाच्या क्लायमॅक्सवेळी हसणाऱ्या तरुणांना प्रेक्षकांनीच अद्दल घडवली

    04-Mar-2025
Total Views | 31

Laughing while Chhaava movie Climax

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Chhaava movie Climax)
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटाने एक वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडल्याचे पाहायला मिळतेय. चित्रपट संपल्यानंतर बाहेर येणाऱ्या बहुतांश प्रेक्षकांचे डोळे पाणावलेले पाहायला मिळाले. मात्र चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनदरम्यान हसल्याबाबत आणि विनोद केल्याबद्दल पाच जणांना माफी मागायला लावल्याची घटना नवी मुंबई येथे घडली आहे. कोपरखैरणे परिसरातील बालाजी मूव्हीप्लेक्स चित्रपटगृहात ही घटना घडली असून सदर प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे.

हे वाचलंत का? : वक्फ बोर्डाने ओलांडली हद्द; आता शिवलिंगावर ठोकला दावा



छावा चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनमध्ये औरंगजेब धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मरणयातना देतानाची दृष्ये दाखवली आहेत. औरंगजेबाने संभाजी महाराजांना धर्मातर करण्यास प्रवृत्त केले असतानाही महाराजांनी हिंदू धर्म सोडला नाही, असे विविध सिन चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये आहेत. यादरम्यान ही पाच जणं हसत असल्याचा आणि विनोद करत असल्याचा असा आरोप इतर प्रेक्षकांकडून करण्यात आला. त्यामुळे त्यांची चूक सुधारण्याकरीता इतर प्रेक्षकांनी त्यांना गुडघे टेकून माफी मागायला लावली.

अग्रलेख
जरुर वाचा
मराठी चित्रपटसृष्टिला धर्मा प्रॉडक्शनचं पाठबळ; ये रे ये रे पैसा ३

मराठी चित्रपटसृष्टिला धर्मा प्रॉडक्शनचं पाठबळ; ये रे ये रे पैसा ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित!

ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर, हिट मराठी कॉमेडी फ्रँचायझी तिसऱ्या भागासह परतली आहे.ये रे ये रे पैसा ३ अखेर येत आहे. यावेळी, निर्माते आणखी गोंधळ आणि मनोरंजनाचे आश्वासन देत आहेत. संजय जाधव हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, तर त्यांनी आणि अरविंद जगताप यांनी एकत्रितपणे पटकथा लिहिली आहे. तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, आनंद इंगळे, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, वनिता खरात, नागेश भोंसले आणि विशाखा सुभेदार या कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. धर्मा प्रॉडक्शन्स ..