गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंची तोफ धडाडणार! पाडवा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क सज्ज
29-Mar-2025
Total Views | 14
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दरवर्षी गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना संबोधित करतात. यावर्षीदेखील रविवार, ३० मार्च रोजी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यासाठी मैदान सज्ज आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मैदानात रविवारी गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. त्यासाठी मैदानात जय्यत तयारी सुरु आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसह राज्यात सुरु असलेल्या विविध विषयांवर राज ठाकरे नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज मैदानात मनसे कार्यकर्त्यांनी बॅनर लावले. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्यात आल्याने चर्चेला उधाण आले होते. यावरून राजकीय वर्तुळात प्रचंड टीका टिपण्णीदेखील झाल्याचे पाहायला मिळाले.