स्टॅलिन सरकारकडून मुस्लीम लांगूलचालनाचा प्रयत्न

तामिळनाडू विधानसभेत ‘वक्फ सुधारणा विधेयका’विरोधात ठराव मंजूर

    28-Mar-2025
Total Views | 21
 
Stalin government on WAQF
 
 
नवी दिल्ली:  ( Stalin government on WAQF ) तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी गुरुवार, दि. २७ मार्च रोजी केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘वक्फ दुरुस्ती विधेयका’विरुद्ध विधानसभेत ठराव मांडला, जो विरोधकांच्या तीव्र विरोधादरम्यान मंजूर करण्यात आला. हा ठराव म्हणजे मुस्लीम लांगूलचालनाचा प्रयत्न असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
 
प्रस्ताव सादर करताना मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले की, “केंद्र सरकारला मुस्लिमांच्या भावनांची पर्वा नाही. केंद्र सरकारने ‘वक्फ कायदा १९९५ ’साठी ‘वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ ’ मागे घ्यावे, यावर विधानसभेने एकमताने भर दिला. केंद्र सरकार ‘वक्फ’ विधेयकात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे ‘वक्फ बोर्डा’च्या अधिकारांना बाधा येईल.”
 
‘वक्फ दुरुस्ती विधेयका’विरुद्ध मांडण्यात आलेल्या ठरावात म्हटले आहे की, भारतातील लोक धार्मिक सौहार्दाने राहत आहेत. संविधानाने प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार दिला आहे. या अधिकाराचे रक्षण करणे, हे निवडून आलेल्या सरकारांचे कर्तव्य आहे. दरम्यान, हा प्रस्ताव सादर करताना विरोधकांनी सभागृहात जोरदार विरोध केला, परंतु प्रस्ताव मंजूर झाला.
 
कर्नाटक विधानसभेतही ठराव मंजूर 
 
कर्नाटक विधानसभेनेही दि. १९ फेब्रुवारी रोजी बुधवारी ‘वक्फ (दुरुस्ती) विधेयका’विरुद्ध ठराव मंजूर केला. हा कायदा देशातील सर्व घटकांच्या आकांक्षा आणि संधींचे प्रतिबिंब पाडत नाही. हे सभागृह ‘वक्फ’ कायद्यातील दुरुस्ती एकमताने नाकारते, कारण हा कायदा कर्नाटकच्या लोकांच्या सार्वत्रिक आकांक्षा आणि धर्मनिरपेक्ष तत्त्वांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे, असे कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने म्हटले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121