फनेल झोनच्या निर्णयातून मुंबईकरांना मोठा दिलासा! आ. प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया

    28-Mar-2025
Total Views | 18
 
Pravin Darekar
 
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारने मुंबईतील फनेल झोनमधील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांचा मार्ग मोकळा करुन मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. तसेच फनेल झोनसारखे निर्णय स्वयंपुनर्विकास चळवळ पुढे घेऊन जाण्यास नक्कीच प्रोत्साहित करणारे आहे, अशी प्रतिक्रिया भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिली.
 
मुंबईतील सांताक्रृझ, पार्ले आणि कुर्ला या भागात विमानतळाच्या फनेल झोनमधील उंचीच्या निर्बधांमुळे बाधित इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळावी यासाठी बृहन्मुंबई विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली-२०३४ मध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. उंचीच्या निबंर्धामुळे जर जागेवर वापरात येणे शक्य नसल्यास तेवढया क्षेत्राचा टिडीआर मालकाला उपलब्ध करुन देण्याचा पुरोगामी निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत केली होती. यावर प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
 
हे वाचलंत का? -  दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नवे वळण! वडिलांचं अफेयर आणि...
 
माध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, “मुंबईतील जुन्या इमारतींचा पुनर्विकास वेगवेगळ्या कारणांमुळे रखडला आहे. मुंबई बँक ही मुंबईतील सहकारी संस्थांची शिखर बँक असून मुंबईतील हाऊसिंग सोसायट्या मुंबई बँकेच्या सभासद आहेत. या हाऊसिंग सोसायटयांबरोबरच इतरही सोसायट्यांना पुनर्विकासात मदत करण्याच्या दृष्टीने मुंबई बँकेने स्वयंपुनर्विकास कर्ज योजना सुरु केली. आतापर्यंत बँकेकडे १६०० गृहनिर्माण संस्थांनी स्वयंपुनर्विकासासाठी बँकेशी संपर्क साधला आहे. २२ प्रकल्पांना आम्ही मंजुरी दिली, १५ सोसायट्यांना २५६ कोटी रुपयांचे कर्ज दिले तर ७ प्रकल्प आतापर्यंत पूर्ण झालेले असून त्यांच्या इमारतीही उभ्या राहिल्यात.”
 
“२०२३ पासून सेल्फ रिडेव्हलपमेंटचे हे प्रकल्प पूर्ण करताना ज्या अडचणी आमच्या लक्षात आल्या त्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही आम्ही स्वयंपुनर्विकासातील १२ अडचणींबाबतचे निवेदन दिले होते. फनेल झोनमधल्या सोसायट्यांचा पुनर्विकास करताना उंचीची मर्यादा येत असल्याने त्यांचा पुनर्विकास होत नव्हता. त्यामुळे सरकारने त्यांना टीडीआर द्यावा, शासकीय शुल्क, प्रिमियममध्ये सवलत द्यावी, अशी मागणी आम्ही त्या निवेदनात केली होती. शासनाने ही मागणी मान्य केली आहे,” असे प्रविण दरेकर यांनी सांगितले. तसेच फनेल झोनमधील सर्व सोसायट्यांच्या वतीने महायूती सरकारचे आभार मानले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

'या'देशातील मुस्लिमांना हजयात्रा करता येणार नाही, भारतासोबत १४ देशातील नागरिकांच्या व्हिसांवर बंदी

Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही...

कंपनीतील कर्मचार्‍यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला, जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडलं; काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

कंपनीतील कर्मचार्‍यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला, जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडलं; काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

Kerala Firm Viral Video : एका खाजगी कंपनीतील बॅासने कर्मचाऱ्यांसोबत अमानुष वागणूक केल्याचा संतापजनक प्रकार केरळमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दोरीने बांधलेल्या गळ्यात पट्टा लावलेल्या कुत्र्यांप्रमाणे रांगायला लावल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असून संबंधित बॉसवर कडक कारवाईची मागणी होत आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामगार मंत्रालयाने याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता हा कथित व्हिडिओ ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121