उद्धव ठाकरेंचा आणि अभ्यासाचा संबंध नाही! ते 'ढ' विद्यार्थी; मंत्री नितेश राणेंचा खोचक टोला

    28-Mar-2025
Total Views | 48
 
Uddhav Thackeray Nitesh Rane
 
सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरेंचा आणि अभ्यासाचा संबंध नाही. ते 'ढ' विद्यार्थी आहेत, असा खोचक टोला मंत्री नितेश राणे यांनी लगावला आहे. शुक्रवार, २८ मार्च रोजी कणकवली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
मंत्री नितेश राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंचा आणि अभ्यासाचा संबंध येत नाही. त्यांना मूळ अर्थसंकल्प कळत नाही. नियम आणि कायदेही कळत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालणारा आपला देश आहे. जो कायदा संसदेला लागू होतो तोच कायदा राज्य सरकारलाही लागू होतो. संसदेत योग्य संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेता नव्हता. हाच नियम प्रत्येक राज्यालाही लागू होतो. परंतू, उद्धव ठाकरेंना याची माहिती घ्यावीशी वाटली नसेल. त्यामुळे अभ्यास आणि उद्धव ठाकरे यांचा काडीमात्र संबंध नाही. ते 'ढ' विद्यार्थी आहेत."
 
हे वाचलंत का? -  एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात रघुनाथ धोंडो कर्वे स्मृती व्याख्यानमाला संपन्न!
 
"आम्हाला उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. त्यांचे राजकीय धर्मांतर झाले आहे. आमच्या स्वागतासाठी लोक अल्लाहू अकबरचे नारे देत नाहीत तर आजही लोक जय श्री राम आणि वंदे मातरम असेच नारे देतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंसारख्या मुल्ला मौलवींसमोर झुकणाऱ्या लोकांनी आम्हाला हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देऊ नये. त्यांनी दाढी कुरवाळत बसावे," अशी टीका त्यांनी केली.
 
जिल्हा नियोजन निधी खर्चात सिंधुदुर्ग जिल्हा पहिल्या क्रमांकावर
 
नितेश राणे म्हणाले की, "पालकमंत्री झाल्यानंतर जिल्ह्याच्या प्रशासनात आर्थिक शिस्त आणण्याच्या दृष्टीकोनातून पावले उलणार असा विश्वास मी जनतेला दिला होता. जिल्ह्यासाठी उपलब्ध असलेल्या निधीचे योग्य नियोजन व्हावे, हा पहिल्या दिवसापासूनच हेतू होता. त्यानुसार ३१ मार्च पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीचा गेल्या वर्षीचा २५० कोटी रुपये निधी १०० टक्के खर्च करून पुढच्या वर्षाची वाटचाल करेन, असे सांगितले होते. सोमवारी ३१ मार्च आहे आणि आजच्या तारखेला गेल्या वर्षीच्या निधीतील ९८ टक्के निधी खर्च झाला आहे. राज्य जिल्हा नियोजन निधी खर्चात आपला जिल्हा ३२ वरून राज्यात पहिल्या क्रमांकवर आला आहे. जिल्ह्यात आर्थिक शिस्त आणण्यासाठी टाकलेले हे पाहिले पाऊल आहे."
 
"परंतू, अशा पद्धतीने शेवटी निधी खर्च करणे हे भुषणावह नाही. आलेला निधी योग्य वेळी खर्च झाला पाहिजे. त्याचे नियोजन झाले पाहिजे. वेळेत बिले काढली पाहिजे. शेवटच्या दोन तीन महिन्यात पाहिजे तशी बिले काढून नियोजन करणे हे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने राणे साहेबांना अपेक्षित नाही. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या वर्षात योग्य नियोजन करून डिसेंबरपर्यंत निधी खर्च होईल. लोकांच्या विकासाच्या मार्गावर कुणी आडवे येत असल्यास ते सहन केले जाणार नाही. जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी योग्य नियोजन केलेले आहे. येणाऱ्या वर्षातही कुपोषित मुक्त जिल्हा करण्याच्या दृष्टीने आम्ही पाऊले उचलत आहोत. जिल्ह्यातील गरीबी संपावी आणि गुंतवणूकसाठी आपला जिल्हा आकर्षक केंद्र बनावा यादृष्टीने प्रयत्न करू," असेही नितेश राणे यांनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121