सुषमा अंधारे आणि कुणाल कामराविरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव

आ. प्रविण दरेकरांनी मांडला हक्कभंग

    27-Mar-2025
Total Views | 34
 
Sushma Andhare Kunal Kamra
 
मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेले गाणे आणि उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी युट्यूबच्या माध्यमातून हेच गाणे पुन्हा टीकात्मक आविर्भावात गाऊन दाखवल्यामुळे त्या दोघांवरही बुधवार, २६ मार्च रोजी विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी हा हक्कभंग प्रस्ताव दाखल केला.
 
सभागृहात बोलताना आ. प्रवीण दरेकर म्हणाले की, "एक प्रकारे हा सभागृहाचा किंबहुना सभागृहातील सगळ्या सदस्यांचा अवमान आहे. त्यांनी एकप्रकारे सभागृहातील सदस्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला असून ही बाब अत्यंत गंभीर आहे. हे सभागृह सर्वोच्च आहे आणि या सभागृहाचा अवमान आम्ही सहन करणार नाही. शिवसेना उबाठा गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी कामरा यांचा स्टुडिओ फोडल्याप्रकरणी यूट्यूब, सोशल मीडियाच्या माध्यमातून बाईट दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्यक्तिगत हिणवणारे गीत करताना कुणाल कामराने जाणूनबुजून हेतुपुरस्सर त्यांची अवहेलना केली असल्याचे स्पष्ट होते."
 
अंधारेंची भाषा सभागृहाचा अवमान करणारी
 
"सुषमा अंधारे यांनी या सभागृहाचा अपमान करण्याचे धाडस केले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात संस्कृती आणि शाब्दिक मर्यादांचे उघडपणे उल्लंघन केले. आपण राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांविषयी बोलत आहोत याचे भानही त्यांनी ठेवले नाही. तथाकथित प्रसिद्धीसाठी उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या आणि एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारे भाष्य करणे नैतिक मूल्यांचे अवमुल्यन आहे. अंधारे यांनी बोलताना वापरलेली खालच्या पातळीवरील भाषा आणि कुणाल कामराने हेतूपूरस्पर उपमुख्यमंत्री यांच्यावर वैयक्तिक आणि उपरोधिक केलेले गाणे यातील भाषा एकप्रकारे सभागृहाचा अवमान करणारी आहे. त्यामुळे कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग मांडण्यास अनुमती द्यावी," अशी विनंती प्रवीण दरेकर यांनी केली. यावर विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे योग्य त्या कारवाईसाठी पाठवत असल्याचे जाहीर केले.
 
"कुणाल कामराने ज्यापद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली त्यावर सभागृहात विरोधी आणि सत्ताधारी पक्षांनी चर्चा केली. यामध्ये सरकारने निवेदन केले. परंतू, निवेदन केल्यानंतरही कुणाल कामराचा अहंकार कमी झाला नाही. त्याने त्याच्या अहंकाराची भाषा दाखवलीच पण सुषमा अंधारे ताईंनीदेखील पुन्हा एकदा तीच कविता रिपीट केली. एखाद्या विषयावर सभागृहात सरकार निवेदन करते तेव्हा तो विषय सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीला सभागृहाच्या बाहेर बोलण्याचा अधिकार नाही. त्यामुळे सभागृहाचा अवमान करण्याचे हे प्रकरण आहे. गटनेते प्रवीण दरेकर यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला असून सभापतींनी ते स्वीकृत केला. आता सभापती महोदय हक्कभंग समितीकडे तो पाठवतील. मी हक्कभंग समितीचा अध्यक्ष असल्याने त्यावर आताच काही बोलणे योग्य नाही. परंतू, त्याचा अभ्यास करून कायदेशीरपणे चौकशी केली जाईल. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ."
 
- आमदार प्रसाद लाड, हक्कभंग समिती अध्यक्ष
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
भारताचा आर्थिक कायापालट : निर्णायक नेतृत्वाने घडवलेले नवे पर्व

भारताचा आर्थिक कायापालट : निर्णायक नेतृत्वाने घडवलेले नवे पर्व

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (खचऋ) एप्रिल 2025च्या ताज्या अहवालाने प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची आणि आत्मविश्वासाची एक नवी ज्योत प्रज्वलित केली आहे. या अहवालानुसार, भारताने 4.187 ट्रिलियन डॉलर्सच्या सकल राष्ट्रीय उत्पादनासह (ॠऊझ) जपानसारख्या विकसित अर्थव्यवस्थेला मागे टाकत, आज जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले नाव कोरले आहे. हे ऐतिहासिक यश म्हणजे, केवळ आकड्यांचा खेळ नसून, ते एका दूरदर्शी नेतृत्वाने, दृढ राजकीय इच्छाशक्तीने आणि सव्वाशे कोटी भारतीयांच्या एकत्रित प्रयत्नांनी गेल्या दशकात ..

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश

(CM Devendra Fadnavis Reviews Maharashtra Security Amid India-Pak Tensions)भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ९ मे रोजी राज्यातील एकूण सुरक्षा व्यवस्थेचा आणि आपत्कालीन तयारीचा सखोल आढावा घेतला. मुंबईतील वर्षा निवासस्थानी घेतलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या गृह, आरोग्य, पोलिस, प्रशासन, आणि महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा झाली. संभाव्य संकट परिस्थितीत नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका कमी करणे आणि प्रशासन सज्ज ठेवणे यावर भर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121