मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय असंविधानिक

विहिंपचे कर्नाटक सरकारवर टिकास्त्र

    24-Mar-2025   
Total Views | 21

VHP on Muslim Reservation in Karnataka

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP on Muslim Reservation in Karnataka)
सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयावर विश्व हिंदू परिषदेने जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर या निर्णयाला असंविधानिक, तुष्टीकरणाची उंची आणि पूर्णपणे अस्वीकारार्ह असल्याचे म्हटले आहे.

हे वाचलंत का? : धर्मांध फहीमच्या घरावर फिरवला बुलडोझर!

विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री बजरंग बागड़ा यांनी बंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अ. भा. प्रतिनिधी सभेत याविशयी सांगितले. ते म्हणाले कर्नाटकचे सध्याचे सरकार अनेक प्रकारे मुस्लिम तुष्टीकरणाच्या मोहिमेमध्ये गुंतले आहे, जे हिंदू समाजाच्या द्वेष आणि न्यून विचारसरणीचा परिणाम आहे.


हिंदू ओबीसी कोट्यातून ४% मुस्लिम आरक्षण हिरावून घेतले गेले आहे, जे हिंदू ओबीसींच्या घटनात्मक अधिकारांवर अतिक्रमण करण्यासारखे आहे आणि विहिंप हे मान्य करत नाही. हा निर्णय प्रभावी होऊ नये यासाठी परिषद सर्वतोपरी प्रयत्न करेल.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
अग्रलेख
जरुर वाचा
पाक उच्चायुक्तालयातील दानिश निघाला ISI एजंट! गद्दारांकडून पाकिस्तानी व्हिसाच्या बदल्यात मागवायचा भारतीय सिमकार्ड

पाक उच्चायुक्तालयातील दानिश निघाला ISI एजंट! गद्दारांकडून पाकिस्तानी व्हिसाच्या बदल्यात मागवायचा भारतीय सिमकार्ड

(Pakistani High Commission official Danish was an ISI agent) ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारताने देशाअंतर्गत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या घरभेद्यांचा शोध सुरु केला. यामध्ये गेल्या आठवड्यात, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह वेगवेगळ्या राज्यांमधून अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. हे सगळे पाकिस्तानी उच्चायुक्तालयात अधिकारी असणाऱ्या आणि आयएसआय एजंट एहसान उर रहीम उर्फ ​​दानिश आणि मुझम्मिल हुसेन उर्फ ​​सॅम हाश्मी यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. या आरोपींना अटक केल्यानंतर, आयएसआय एजंट दानिश आणि ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121