अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच मोठ्या पडद्यावर परतणार; मातृत्वानंतरच्या नव्या टप्प्यावर तिचे मत

    20-Mar-2025
Total Views | 11
 
 
 
deepika padukone will soon return to the big screen; her thoughts on the new phase after motherhood
 
 
 
मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण ओम शांती ओम, पद्मावत, पठाण गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये ती आणि तिचा पती रणवीर सिंग यांनी त्यांच्या पहिल्या अपत्याचे स्वागत केले. त्यांच्या मुलीचे नाव दुआ पादुकोण सिंग असे ठेवण्यात आले. मुलीच्या जन्मानंतर दीपिका कोणत्याही चित्रपटात झळकलेली नाही. मात्र, आता ती लवकरच कामावर परतण्याच्या तयारीत असून, तिच्या पुनरागमनाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
 
 
आईपण आणि करिअरमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न:
अबू धाबी येथे पार पडलेल्या फोर्ब्स परिषदेच्या वेळी दीपिकाने पहिल्यांदाच आपल्या मातृत्व आणि करिअरबाबत भाष्य केले. ती म्हणाली, “आई झाल्यानंतर कामावर परतताना कोणत्याही प्रकारची अपराधी भावना बाळगायची नाही. माझ्या मुलीची जबाबदारी सांभाळतानाच करिअरमध्येही योग्य समतोल साधण्याचा मी प्रयत्न करत आहे.”
 
तिच्या चित्रपट निवडीवर मातृत्वाचा प्रभाव पडणार असल्याचेही तिने स्पष्ट केले. “मातृत्व हा एक अद्भुत अनुभव आहे. मी जाणीवपूर्वक असे करणार नाही, पण नकळतपणे मी ज्या भूमिका स्वीकारेन त्यावर याचा परिणाम होईल. मात्र, आई होण्याआधीही मी या बाबतीत जागरूक होते.”
 
 
दीपिकाचे नवीन प्रकल्प कोणते?
दीपिका लवकरच पंजाबी गायक दिलजीत दोसांजच्या एका संगीत व्हिडिओमध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, हा प्रकल्प फराह खान कोरिओग्राफ करणार आहे. फराह खाननेच ओम शांती ओम चित्रपटाद्वारे दीपिकाला बॉलिवूडमध्ये पदार्पणाची संधी दिली होती. मात्र, या प्रकल्पाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. याशिवाय, दीपिका ‘कल्की २८९८ ए.डी.’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात दिसणार आहे. प्रभास, अमिताभ बच्चन आणि कमल हसन यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 







अग्रलेख
जरुर वाचा
पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!

पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,"जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!''

भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शस्त्रसंधी असूनही पाकिस्तानकडून कुरापती थांबलेल्या नाहीत. शनिवारी रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. अशा परिस्थितीत देशाच्या जवानांची शौर्यगाथा सर्वत्र गौरवली जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर 'सदीच्या महानायक' अमिताभ बच्चन यांचं मौन कायम होतं. पाहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'नंतरही त्यांनी सोशल मीडियावर काहीही प्रतिक्रिया दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121