दिशा सालियानचा सामुहिक बलात्कार करूनच हत्या! वडील सतीश सालियान यांची हायकोर्टात याचिका

पुन्हा नव्याने चौकशी करण्याची मागणी

    20-Mar-2025
Total Views |
 
Disha Saliyan
 
मुंबई : दिशा सालियानवर सामुहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप करत या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यासाठी वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
 
मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकत हे प्रकरण दाबले. त्यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा आरोप दिशाच्या वडीलांनी याचिकेतून केला आहे. दिशाचा सामुहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केली असून या प्रकरणाची एनआयए चौकशीची करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
 
तसेच याप्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. यासोबतच आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्या यांच्यासह मुंबई पोलीसांवरही या याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे तसेच पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपांत तथ्य असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा