"हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी औरंगजेब आला होता नंतर तोच नष्ट झाला...", हिमंता बिस्वा सरमा राहुल गांधी आणि ममता बॅनर्जींवर आक्रमक

    02-Mar-2025
Total Views |
 
Himanta Biswa Sarma
 
कोलकाता (Himanta Biswa Sarma) : हिंदू धर्माला नष्ट करण्यासाठी औरंगजेब आला होता. मात्र नंतर तोच नष्ट झाला. त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प.बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हिंदूंना संपवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र ते शक्य नाही, शेवटी त्यांचाच नाश होईल, असे प्रतिपादन आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केले आहे. ते कोलकातामधील एका कार्यक्रमात बोलत होते.
 
ते म्हणाले की, या देशाला डाव्या विचारसरणीच्या आणि उदारमतवादी विचारांच्या लोकांना वेढले आहे. त्यानंतर अशा लोकांना पदमश्री देण्यात आला. त्यानंतर हे पुरस्कर्ते हिंदूंविरोधात गरळ ओकू लागले होते. काँग्रेस काळात इतके घोटाळे झाले होते की, हिंदूंना न्यायालयाच्या दालनात उभे केले जायचे आणि त्यांना हिंदू बोलू नका, धर्म निरपेक्षतेचं गाऱ्हाणं गा असे सांगितले. तसेच देशावर सर्वात आधी अल्पसंख्यांकांचा अधिकार असेल असे सांगितले. पण अनेकदा धर्मस्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर हिंदूंना मुस्लिम आणि ख्रिश्चनांपासून धोका आहे असे तर मला वाटत नाही. मी हे कधीच मानले नाही. खरं तर ते दोघेही भारतातील अल्पसंख्यांक आहेत. हिंदूंना आपल्याच समाजापासून धोका आहे.
 
 
 
त्यानंतर ते म्हणाले की, हिंदूंना असे तसे संपवता येणार नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्या म्हणण्यानुसार हिंदूंचा नाश होणार नाही. आधी त्यांचा नाश होईल. त्यानंतर ते म्हणाले की, हिंदूंना संपवता येणार नाही कारण आपली संस्कती ही गेली ५ हजार वर्षांपासून जुनी आहे. औरंगजेबही हिंदूंना संपवू इच्छित होता पण नंतर ते स्वत : नष्ट झाला पण हिंदू धर्म नष्ट झाला नाही.
 
तसेच ते म्हणाले की, हिंदूंना मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मापेक्षा डाव्या उदारमतवादी विचारांच्या लोकांपासून अधिक धोका असल्याचे हिमंता बिस्वा सरमा म्हणाले होते.