Nagpur Violence : ६५ आरोपी ताब्यात, अनेक भागात संचारबंदी लागू

    18-Mar-2025   
Total Views | 66

Nagpur Violence Accused Arrested

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Nagpur Violence Accused Arrested) 
औरंगजेबाच्या थडग्यावरून राज्यात सुरु असलेल्या वादाला सोमवारी नागपुरात हिंसक वळण लागले. महाल परिसरात दोन गटात तणाव वाढला आणि काही वेळातच हिंसाचार उसळला. अगदी हंसपुरीपर्यंत तो रात्री पोहोचल्याचे निदर्शनास आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अनेक भागात संचारबंदी लागू केली आहे. आतापर्यंत ६० ते ६५ हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

 हे वाचलंत का? : जमावाकडून दगडफेक ते पोलिस उपायुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला! नागपूर घटनेबाबत मुख्यमंत्र्यांचे सभागृहात निवेदन; हिंसाचाराचा संपूर्ण घटनाक्रम केला उघड

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेसात वाजता सर्वप्रथम महाल परिसरात हिंसाचार सुरू झाला. जमावाने पोलिसांवर दगडफेक केली आणि अनेक वाहने पेटवून दिली. यात अनेक पोलीस जखमी झाले. दरम्यान १० हून अधिक दुचाकी आणि तीन कार, जेसीबी, क्रेन जळून खाक झाल्या आहेत. यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास हंसपुरीच्या जुना भंडारा पथावर हिंसाचार झाला. येथे जमावाने वाहनांना लक्ष्य केले आणि काही घरांवर हल्ले केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला.

हिंसाचारानंतर नागपुरातील कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपौली, शांतीनगर, शक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर इत्यादी भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कर्फ्यू दरम्यान, कोणत्याही आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई आहे आणि पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास देखील मनाई आहे. तथापि, वैद्यकीय आणीबाणी, परीक्षेला बसलेले विद्यार्थी आणि अत्यावश्यक सेवांशी संबंधित लोकांना सूट देण्यात आली आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महल परिसरातील हिंसाचार अफवा आणि गैरसमजातून सुरू झाला. परंतु परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने गुन्हेगारांची ओळख पटवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
अग्रलेख
जरुर वाचा

'रणबीर कपूरला बॉयकॉट करण्याची त्यांची औकातच नाही', विवेक अग्निहोत्रींचा बॉलिवूडवर सडकून हल्ला!

'द काश्मीर फाईल्स' आणि 'द ताश्केंट फाईल्स' यांसारख्या वादग्रस्त चित्रपटांचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडवर थेट टीका केली आहे. मोठ्या बॉलिवूड निर्माते आणि दिग्दर्शक हे सुपरस्टार्सच्या वागणुकीला कंटाळले असूनही त्यांच्या विरोधात उघडपणे बोलण्याची कोणाचीच हिंमत नसल्याचं अग्निहोत्रींनी स्पष्टपणे सांगितलं. त्यांचा रोख विशेषतः अभिनेता रणबीर कपूरकडे होता, ज्याच्यावर ‘अ‍ॅनिमल’ या वादग्रस्त चित्रपटामुळे मोठ्या प्रमाणात टीका झाली, मात्र तरीही त्याचं संरक्षण केलं गेलं...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121