नागपूर हिंसाचारावर अबू आझमींचे मगरीचे अश्रू

शांतता ठेवण्याचे जनतेला आवाहन

    18-Mar-2025   
Total Views | 33

Abu Azmi on Nagpur Violence

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Abu Azmi on Nagpur Violence)
"ज्या नागपूरमध्ये कधीच सांप्रदायिक दंगल झाली नाहीत तिथे असा हिंसाचार झाल्याने मला दुःख होत आहे.", असे मत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी व्यक्त केले आहे. त्यांनी एका व्हिडिओद्वारे लोकांना शांतता ठेवण्याचे व खोट्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. ज्या अबू आझमींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान क्रूरकर्मा औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळली, तेच आज नागपूर हिंसाचारावर मगरीचे अश्रू वाहताना दिसत आहेत.

हे वाचलंत का? : जिहादी कारवायांना उघडपणे समर्थन; 'या' प्रसिद्ध चॅनलवर होणार कारवाई



ते म्हणाले की, "या हिंसाचारात अनेक जण जखमी झालेत, ही गंभीर बाब आहे. रमजानचा पवित्र महिना सुरु आहे, त्यामुळे कोणाच्याही भडकाऊ भाषणावर भूलू नका. आपल्याला शांतता ठेवायची आहे. शांततेच्या मार्गानेच देशाला पुढे घेऊन जायचं आहे. आणि त्यासाठी आपापसांत लढून चालणार नाही." पोलिसांकडून सध्या तपास सुरू असल्याने कोणीही कायदा हातात न घेण्याचे आवाहन अबू आझमींनी केले आहे.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121