धुलीवंदन साजरा करणाऱ्यांमुळे इस्लामी व्यक्तीचा मृत्यू असा दावा करणाऱ्यांचे पितळ उघडे

    16-Mar-2025
Total Views | 18
 
Unnav
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये होळी दरम्यान रंग फेकण्यावरून झालेल्या वादातून मशिदीत जाताना मारहाणीत ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलीस आपल्या पथकांसोबत घटनास्थळी आले आणि त्यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र, संबंधित मृत व्यक्तीच्या शवविच्छेदन तपासणीच्या अहवालातून मोठी माहिती समोर आली आहे.
 
४५ वर्षीय शरीफ असे मृत व्यक्तीचे नाव असून तो सदरमधील कासिम नगर रब्बाना मशिदीच्या परिसरात वास्तव्यास होता. तो सौदी अरोबियात वाहन चालकाचे काम करत होता. दोन महिन्यांपूर्वी तो आपल्या घरी परतला होता. शनिवारी, मोहल्ला कांजीमधील त्याच्या घरातून मशिदीत जात असताना, एका वसाहतीत त्याची धुलीवंदन सण साजरा करणाऱ्यांशी भेट झाली, अशी माहिती एका वृत्त माध्यमाने दिली.
 
यावरूनच आता एका ट्विटर हँडेलवरून शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये आरोप करण्यात आला होता की, धुलीवंदन साजरा करणाऱ्यांमुळेच मुस्लिम व्यक्तीचा मृत्यू झाला. हिंदू जमावाने केलेल्या मारहाणीत मुस्लिम व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा इस्लामी सोशल मीडिया वापरकर्त्याने म्हटले. त्यानंतर आता उन्नाव पोलिसांनी म्हटले होते की, मृत व्यक्तीचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला.
 
 
 
या प्रकरणासंबंधित पोलिसांनी सांगितले की, मृताचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. त्यानंतर डॉक्टरांनी शवविच्छेदन केले आणि त्या अहवलात शरीरावर कुठेही जखम झाली नसल्याचे नमूद करण्यात आले. या प्रकरणाचा पोलीस प्रशासन तपास करत आहे.
 
 
त्यामुळे, असा निष्कर्ष लावण्यात येत आहे की, संबंधित व्यक्तीचा मृत्यू हा होळीचा सण साजरा करणाऱ्यांमुळे नाहीतर हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121