दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

    13-Mar-2025
Total Views | 10
 
late Yashwantrao Chavan on his birth anniversary
 
मुंबई: ( Tributes to the late Yashwantrao Chavan on his birth anniversary ) आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
 
याप्रसंगी मंत्री महोदय व दोन्ही सभागृहातील सदस्य तसेच विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (2) (कार्यभार) डॉ.विलास आठवले आणि विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121