धर्मरक्षक संभाजीमहाराजांचे तुळापूर येथे भव्य स्मारक उभारणार!

    10-Mar-2025
Total Views | 14

chhatrapati

मुंबई : स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक त्यांच्या बलिदानस्थळी मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ मौजे वढु बुद्रुक येथे उभारण्यात येणार असून, सदर स्मारकाचे काम प्रगतीपथावर असल्याची घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांनी केली. दि. १० मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा २०२५ -२६ सालचा अर्थसंकल्प सादर करताना ते बोलत होते.

छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या, असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या, सर्व लढायांत विजयश्री मिळविणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत, त्यात कोकणातील संगमेश्वर हे एक प्रमुख ठिकाण आहे. औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्थ केली. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. या स्मरकाचे काम प्रगतीपथावर असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. त्याच बरोबर दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला ' छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत' पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय सुद्धा शासनाने घेतला आहे.

'या' गीताला मिळाला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीताचा पहिला पुरस्कार! 
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी फ्रान्स या देशातील मार्सेलिसच्या समद्र किनाऱ्यावरून पहिल्या छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीताचा पुरस्कार जाहीर केला होता. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सुप्रसिद्ध अनादि मी...अनंत मी...या अमर प्रेरणा गीताला हा पुरस्कार जाहीर झाला. छत्रपती संभाजी महाराज हे एक महान योद्धे, कुशल प्रशासक, पराक्रमी तर होतेच, त्याच बरोबर ते कवी मनाचे राजे होते, म्हणूनच हा पुरस्कार त्यांच्या नावाने देण्याचा निर्णय घेण्यात आला असे मत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केले.


 
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121