वाहनांना 'एचएसआरपी' प्लेट लावण्यास सुरुवात

नंबर प्लेटचे दर अन्य राज्यातील दरांप्रमाणेच ; निवडलेल्या कंपन्यांची निविदा प्रक्रियाही नियमानुसार

    01-Mar-2025
Total Views | 46

hsrp



मुंबई, दि. २८: प्रतिनिधी 
देशातील बहुतेक राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी) नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातही ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातील दुचाकी, तीन चाकी, चार चाकी व जड वाहनांचे ही नंबर प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांमधील दराप्रमाणे आहे.

राज्यात एचएसआरपी लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. या निविदेमध्ये प्राप्त कमी दर दिलेल्या तीन निविदाकारांची निविदा मान्य करुन उच्चाधिकार समितीने ३ कंपन्यांचे दर अंतिम केले आहेत. मान्य झालेल्या दरानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाने कार्यारंभ आदेश जारी केले.राज्यात ठरवून दिलेले दर हे 'एचएसआरपी' नंबर प्लेट व फिटमेंट चार्जेससह आहेत. अन्य राज्यात जीएसटी वगळून दुचाकीचे दर प्रतिवाहन ४२० ते ४८० रुपये, तीन चाकी वाहन ४५० ते ५५०, चार चाकी वाहन व जड वाहने ६९० ते ८०० रुपये आहेत. तर राज्यामध्ये जीएसटी वगळून दुचाकी प्रतिवाहन ४५० रुपये, तीन चाकी ५००, चार चाकी व जड वाहने ७४५ रुपये आहे. यावरून राज्यातील दर अन्य राज्यांमधील दरांप्रमाणेच असल्याचे दिसून येते.

केंद्रीय मोटार नियम १९८९ चे नियमानुसार सर्व वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' बसविणे बंधनकारक आहे. वाहन विक्रेत्याकडून ०१एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. मात्र ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार लावणे बंधनकारक केले आहे. तसेच काही राज्यातील दर फिटमेंट चार्जेसशिवाय आहेत. या दरांची माहिती भारतीय वाहन उद्योगाच्या एसआयएएम या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे परिवहन विभागाने कळविले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

(Hudson River Helicopter Crash) अमेरिकेच्या न्यू यॉर्कमधील हडसन नदीत गुरुवार दि. १० एप्रिल रोजी प्रवासी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक पायलट आणि स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. मृतांमध्ये सीमेन्स कंपनीचे स्पेनचे अध्यक्ष आणि आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचाही समावेश आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121