राजधानीतील बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या मुसक्या आवळा अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निर्देश; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

    01-Mar-2025
Total Views | 32

amit shah on Bangladeshis and Rohingyas in delhi 
 
नवी दिल्ली: ( amit shah ) दिल्लीत बेकायदा राहणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांच्या मुसक्या आवळा असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी रोजी पोलीस प्रशासनास दिले आहेत.
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला दिल्लीचे गृहमंत्री आशिष सूद दिल्लीचे पोलीस आयुक्त कायदा-सुव्यवस्था आणि समन्वय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना देशात प्रवेश करण्यास, त्यांची कागदपत्रे बनवण्यास आणि येथे त्यांचा मुक्काम सुलभ करण्यास मदत करणार्‍या संपूर्ण नेटवर्कवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. “बेकायदेशीर घुसखोरांचा प्रश्न हा राष्ट्रीय सुरक्षेशीदेखील संबंधित आहे आणि त्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि त्यांना ओळखून तेथून हद्दपार केले पाहिजे,” असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
 
“दिल्लीतील आंतरराज्यीय टोळ्यांना कठोरपणे संपवणे ही दिल्ली पोलिसांची प्राथमिकता असावी,” असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांनी पोलीस ठाण्यात जाऊन जनसुनावणी शिबिरे आयोजित करावीत आणि जनतेच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. दिल्ली पोलिसांनी दररोज वाहतुककोंडी असलेल्या ठिकाणांची ओळख पटवावी आणि दिल्ली पोलीस आयुक्त आणि मुख्य सचिवांनी भेटून यावर त्वरित तोडगा काढावा, जेणेकरून जनतेला दिलासा मिळेल. त्याचप्रमाणे, दिल्ली सरकारने पाणी साचणार्‍या ठिकाणांची ओळख पटवून पाणी साचण्याच्या समस्येवर ‘मान्सून कृती आराखडा’ तयार करावा,” असेही निर्देश शाह यांनी दिल्ली सरकारला दिले आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात हिंसाचार कायम!धर्मांधांनी हिंदूंच्याच दुकानांना केले लक्ष्य; अहिंदूंची दुकाने शाबूत, तर काहींनी भितीपोटी मालदात केले स्थलांतर

मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात हिंसाचार कायम!धर्मांधांनी हिंदूंच्याच दुकानांना केले लक्ष्य; अहिंदूंची दुकाने शाबूत, तर काहींनी भितीपोटी मालदात केले स्थलांतर

Waqf Amendment Act पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायदा संसदेत पारित केल्यानंतर धर्मांधांनी हिंदूंवर, त्यांच्या घरांवर आणि दुकानांना टार्गेट करताना दिसले आहेत. मात्र, मुस्लिमांच्या दुकानांना काहीच झाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर इस्लामी कट्टरपंथीयांनी पेट्रोल आणि बॉम्बने हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले. अशातच आता मुर्शिदाबादमधून काही हिंदूंनी परिस्थिती पाहता पळ काढला आहे. अशातच संबंधित परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ममता बॅनर्जी सरकार अपयशी ठरल्याच्या टीका विरोधकांकडून ..

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादी विरोधी पथकाने समुद्रातील ड्रग्ज तस्करीचा साठा केला जप्त

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादी विरोधी पथकाने समुद्रातील ड्रग्ज तस्करीचा साठा केला जप्त

Drugs Smuggler भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. ज्यात त्यांना मोठे यश संपादन करता आले आहे, १२-१३ एप्रिलच्या रात्री भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाईमध्ये समुद्रातून तस्करी करत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ३०० किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत, ज्याची किंमत सुमारे १८०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे औषध मेथाम्फोटामाइन असण्याची शक्यता असून यासंदर्भात अजूनही चौकशी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121