स्वारगेट अत्याचार प्रकरणी महिला जागर समिती आक्रमक! हातात तिरडी घेत बसस्थानकात आंदोलन

    01-Mar-2025
Total Views |
 
Pune Swargate
 
पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणी पुण्यातील महिला जागर समिती आक्रमक झाली असून बसस्थानकात तिरडी आंदोलन करण्यात येत आहे. आरोपी दत्तात्रय गाडेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी या महिलांकडून करण्यात आली आहे.
 
शनिवार, १ मार्च रोजी स्वारगेट बसस्थानकात महिला जागर समितीच्या वतीने तिरडी आंदोलन करण्यात आले. महिला सुरक्षेच्या अनुषंगाने हातात तिरडी घेत आंदोलक महिलांकडून जोरदार घोषणा देण्यात येत आहेत. यासोबतच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधही या महिलांकडून करण्यात आला आहे.
 
हे वाचलंत का? -  आमदार शरद सोनावणे यांच्या हाती धनुष्यबाण! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न
 
तसेच एसटी महामंडळाच्या लोकांवर सरकारने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. स्वारगेट बसस्थानक परिसरात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी आरोपी दत्तात्रय गाडेला शुक्रवारी १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आता त्याला फाशी देण्याची मागणी सगळीकडे करण्यात येत आहे.