'मारो देव बापू सेवालाल', बंजारा लुकमधील अमृता फडणवीसांचे नवीन गाणं रिलीज!
09-Feb-2025
Total Views | 45
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ७ जानेवारीला एका नवीन गाण्याची घोषणा केली होती. ज्यासाठी त्यांनी एक पोस्ट शेअर करत म्हटलेले, ‘मी पुन्हा येत आहे.. आपली संस्कृती आणि धरोहर तुमच्यापर्यंत पोहचविण्यासाठी.. संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमीत्ताने एक गीत घेऊन.. संपर्कात रहा’. या पोस्टनंतर ८ जानेवारीला ‘मारो देव बापू सेवालाल’ हे गाणे रिलीज करण्यात आले.
गाण्यात बापू सेवालाल देवाची मनोभावे भक्ती करताना दिसून येत आहे. या गाण्याचे गायन अमृता फडणवीस यांनी केले आहे. तर गाण्याचे गीतकार निलेश जालमकर आहेत. संगीत दिग्दर्शन कामोद सुभाष यांनी केले आहे. अमृता फडणवीस एक उत्तम गायिका आहेत. आतापर्यंत त्यांची अनेक गाणी प्रदर्शित झाली आहेत. या गाण्यांसाठी त्यांना रसिकांकडून कधी दाद मिळते तर कधी ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र, अमृता फडणवीस कायम आपलॆ गायनाची आवड जोपासताना दिसल्या आहेत. अशातच नुकतंच त्यांचं आणखी एक गाणं प्रदर्शित झालं या गाण्याचं नाव ‘मारो देव बापू सेवालाल’ असे आहे. टी सीरिजच्या बॅनरखाली हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.
‘मारो देव बापू सेवालाल’ या गाण्यात अमृता फडणवीस यांनी पारंपारिक बंजारा पोशाख परिधान केला आहे. यातील अमृता फडणवीसांचा बंजारा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
त्यांचा हा बंजारा लूक सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. या लूकसाठी आणि सुमधुर गायनासाठी नेटकऱ्यांनी अमृता यांचे कौतुक केले आहे.
‘महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून आपण ओळखतो. यात टी सिरीजने आजपर्यंत संत श्री सेवालाल महाराज यांचे गाणे कधीही चॅनेलवर टाकले नाही. मात्र, तुमच्या माध्यमातून आज हे गाणे प्रसिद्ध झाले. आपण कोणत्या जातीचे आहोत, धर्माचे आहोत यापेक्षा आपण महाराष्ट्राच्या या संतभूमीचे आहोत हे महत्वाचे आहे’. अश्या प्रतिक्रीयेतून अमृता फडणवीसांचे कौतुक व आभार व्यक्त केले जात आहे.