नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दारूण पराभव झाला आहे. आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार परवेश वर्मा यांनी ४ हजार ८९ मतांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करण्यासाठी आम आदमी पक्षाची स्थापना करणारे अरविंद केजरीवाल हे स्वत:च भ्रष्टाचारात गुंतले. यासाठी त्यांना तुरुंगवारीसुद्धा करावी लागली. शिवाय त्यांना मुख्यमंत्रीपदही गमवावे लागले.
अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचादेखील पराभव झाला आहे. या दोन बड्या नेत्यांच्या पराभवाने आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासून अरविंद केजरीवाल पिछाडीवर असून आता त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे.